राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल शर्माने मांडले आपले मत; म्हणाला..

'लोकसभा निवडणूक २०२४'ची (Lok Sabha Election 2024) चर्चा सगळीकडे चालू आहे.

राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल शर्माने मांडले आपले मत; म्हणाला..

‘लोकसभा निवडणूक २०२४’ची (Lok Sabha Election 2024) चर्चा सगळीकडे चालू आहे. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut), अरुण गोविलसह (Arun Govil), गोविंदा असे अनेक कलाकार ‘लोकसभा निवडणूक २०२४’ लढवणार आहेत.त्यामुळे आता विनोदवीर कपिल शर्मा राजकारणात प्रवेश करणार का ? याची चर्चा चालू आहे. आता नुकतच याबद्दल त्याने सांगितलं आहे. कपिल शर्मा सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमच प्रमोशन सगळी चालू आहे. त्यादरम्यान त्याने ‘आपकी अदालत’ येथे हजेरी लावली होती.

त्यावेळी त्याला रजत शर्मा (Rajat Sharma) ने राजकारणाबद्दल एक प्रश्न विचारला होता. रजत शर्मा ने प्रश्न विचारला की “अनेक विनोदवीरांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. तुम्हीदेखील राजकारणात एन्ट्री करण्याचा विचार करत आहात का?” याच त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिला आहे. तो म्हणाला मला असं वाटतं की राजकारणात एन्ट्री केल्यानंतर ती व्यक्ती अधिक सीरियस होते. का ते माहिती नाही. मला मस्ती-मजा करत आयुष्य जगायला आवडतं. राजकारणी झाल्यानंतर सीरियस व्हावं लागतं. मी कधीही सीरियस व्यक्ती होऊ शकत नाही. मी जे करतोय त्यात आनंदी आहे. बाकी वेळेचं काही सांगता येत नाही” असे त्याने म्हंटले आहे.कपिल शर्मा ने २०१३ मध्ये “कॉमेडी विथ कपिल” या कार्यक्रमापासून सुरवात केली. या कार्यक्रमाच प्रसारण कलर्स चॅनेल वरती होत असे. त्यानंतर त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ सोनी चॅनेल सुरु झाला होता. अनेक वर्ष तोच छोट्या पाड्यावरती काम चालू होते. आता नेटफ्लिक्स वरती त्याचा कार्यक्रम पाह्यला भेटणार आहे. ३०मार्च रात्री ८ वाजता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्स वरती दिसणार आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा कार्यक्रमच सूत्रसंचालन कपिल करणार आहे. अर्चना पूरन सिंह हि परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सात वर्षांनी या कार्यकर्माच्या माध्यमातून सुनील ग्रोवर पुन्हा एकदा दिसणार आहे. सुनील ग्रोवरसह कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि राजीव ठाकुर हे कलाकार या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत.

कपिल शर्मा चा जन्म २ एप्रिल १९८१ झाला. पंजाबमधील अमृतसर येथील एका मध्यवर्ती कुटुंबातला आहे. कपिलच्या आईच नाव जनक राणी आहे. त्याच्या वडिलांचं नाव जितेंद्र कुमार आहे. त्यांच निधन २००४ मध्ये झाला. कपिल शर्मा ने त्याच्या गर्लफ्रेंड गिन्नी चनरथ सोबत २०१८ मध्ये लग्न केले आहे. कपिल शर्मा हा महागडा विनोदवीर आहे. महेनतीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. कपिल शर्माची संपत्ती एकूण ३३० कोटींची आहे. ‘किस किसको प्यार करू’ या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले आहे. त्याचा हा चित्रपट ‘किस किसको प्यार करू सुपरहिट झाला होता. आणि आता ‘क्रू’ (Crew) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हे ही वाचा:

सत्तेसाठी बाप बदलणाऱ्यांना काय म्हणावं? सुषमा अंधारेंची नवनीत राणांवर टीका

छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गट आक्रमक, भुजबळांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version