तेव्हा Ashok Saraf यांना न सांगताच…महेश कोठारेंची कबुली

अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्या मैत्रीत काही काळासाठी कटुता निर्माण झाली होती. जिथे एकत्र काम करणे आले तिथे गैरसमज, वादविवाद हे येणारच.

तेव्हा Ashok Saraf यांना न सांगताच…महेश कोठारेंची कबुली

मराठी चित्रपटसृष्टीतील अनमोल सितारे म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे. या जोड्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवीन ओळख मिळवून दिली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व विनोदी बुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांना त्यांनी पुन्हा एकदा मराठी सिनेमा पाहण्यास भाग पाडले. त्यांची घट्ट मैत्री जशी सिनेमांमध्ये होती तशी पडद्यामागे सुद्धा होती.

अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्या मैत्रीत काही काळासाठी कटुता निर्माण झाली होती. जिथे एकत्र काम करणे आले तिथे गैरसमज, वादविवाद हे येणारच. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची घनिष्ट मैत्री तर सर्वाना माहित आहे. ‘धुमधडाका’ चित्रपटानंतर महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यातही चांगली मैत्री झाली. पण काही कारणामुळे त्या दोघांमध्ये थोडे गैरसमज झाले. याबद्दल माहिती देताना महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “अशोक सराफ, ‘धुमधडाका’ चित्रपटानंतर माझ्याबरोबर नव्हता. काही चुका या माझ्याकडून झाल्या त्या मी मान्य करतो. मला असे वाटत होते की, धुमधडाकाच्या यशानंतर आपण जेव्हा पुढचा प्रोजेक्ट करू तेव्हा महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकुटच असले पाहिजे. पण जेव्हा मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो तेव्हा मला वाटायला लागले की ज्या स्क्रिप्टवर आम्ही काम करतोय, ते पात्र अशोक सराफच्या भूमिकेला न्याय देत नाही.”

पुढे ते म्हणाले की, “आपण अशोकला आगामी चित्रपटात घेऊ असे बोलत आहोत पण उगाच अशोकला घेऊन त्याचा वेळ वाया नाही घालवायचा. म्हणून तेव्हा अशोकला त्या चित्रपटातून काढले. ही गोष्ट मी अशोकला कळवायला पाहिजे होती, पण ही गोष्ट त्याला न कळवताच काम सुरु केले आणि तिकडे मी चुकलो. मला नंतर त्याची जाणीव झाली.” महेश कोठारे म्हणाले की, “जेव्हा मी ‘शुभमंगल सावधान’ हा प्रोजेक्ट करायचा ठरवला तेव्हा माझ्यासमोर अशोक सराफ शिवाय दुसरा कोणता कलाकारच डोळ्यासमोर आला नाही. अशोक सराफ मला जिथे पाहिजे तिथे मला पाहिजेच होता. जसा तो खूप चांगला अभिनेता आहे तसा तो माझा चांगला मित्रपण आहे. अशोकाने जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याला ती खूप आवडली आणि म्हणून त्याने होकार दिला. या चित्रपटानंतर आमच्यातील दुरावा संपला. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंतीला पडला होता. महेश कोठारे आणि अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’, ‘शुभमंगल सावधान’ याशिवाय ‘दे दणादण’, ‘आयडियाची कल्पना’, ‘गुपचूप गुपचूप’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे.

हे ही वाचा:

NEET Exam घोटाळा: फेरपरीक्षा घेण्यावरून पालक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Coastal Road नागरिकांसाठी खुला, ‘या’ वेळेत करता येणार प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version