Thursday, July 4, 2024

Latest Posts

वो ‘स्त्री’ आ रही हैं, Stree चित्रपटाचा भयानक टीझर लॉन्च

'स्त्री २' (Stree २) हा अधिक मजेदार आणि धडकी भरवणारा या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकब्लस्टर होण्याची तयारीही निर्मात्याने केली आहे. या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha kapoor) हे चाहत्या प्रेक्षक वर्गाला मनोरंजन करण्यासाठी परत आले आहे.

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या हॉरर कॉमेडी ‘स्त्री’ (Stree) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली असून निर्मात्याने त्याचा टीझर रिलीज केला आहे. हा टिझर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही तर थेट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री २’ (Stree २) हा अधिक मजेदार आणि धडकी भरवणारा या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकब्लस्टर होण्याची तयारीही निर्मात्याने केली आहे. या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha kapoor) हे  प्रेक्षक वर्गाला मनोरंजन करण्यासाठी परत आले आहे. ‘स्त्री २’ चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सने बनवला आहे.

‘मुंज्या’ (Munjya) चित्रपटाच्या मध्येच ‘स्त्री २’ चा टीझर रिलीज करून एक नवीन ट्विस्ट निर्मात्याने दिला आहे. हा टिझर आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी त्याला पसंती दिली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्त्री २ चा टीझर मुंज्या चित्रपटाबरोबर थेट चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये एक भयानक आणि मजेदार सिक्वेल आहे. या आगामी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में (Khel Khel Mein) ‘आणि जॉन अब्राहमच्या ‘वेद’ (Ved) या चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे. स्त्री २ या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर या मुख्य कलाकारांसोबत अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि इतर कलाकार आहेत.

२०२४ मध्ये राजकुमार रावचे एका पाठोपाठ चित्रपट रिलीज होत आहेत. यावरून तो किती कमालीचा अभिनेता आहे हे दिसून येते. तो ‘श्रीकांत’ (Shrikant) या चित्रपटात दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत दिसला होता. ज्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती. तर त्याच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi) मध्ये तो क्रिकेटर कोचच्या भूमिकेत दिसला होता. खरं तर स्त्री या चित्रपटानंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. आता असे चित्र दिसत आहे की ‘स्त्री २’ हा चित्रपट पूर्वीचे रेकॉर्ड मोडून पुढे जाईल. दोन वैविध्यपूर्ण भूमिका ज्यांनी राजकुमार रावला या पुरस्काराच्या मोसमात नक्कीच पसंती दिली आहे. त्यांनी अभिनेत्याची अष्टपैलुत्व सिद्ध केली आहे तसेच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. खरं तर, ‘स्त्री’ नंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आणि आता असे दिसते आहे की ‘स्त्री 2’ पूर्वीचे रेकॉर्ड देखील मोडेल. राजकुमार राव इथेच ना थांबता ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video) मध्ये अभिनेत्री तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे.

‘स्त्री’ या चित्रपटाच्या ‘ओ स्त्री कल आना’ या डायलॉगला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा या वाढल्या असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरेल असा दावा चित्रपट निर्मात्याने केला आहे.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss