spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्यांची एन्ट्री

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवत आहेत.

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवत आहेत. अगदी कमी वेळात या मालिकेने सर्वांचं मनावर अधिराज्य केलं आहे. परंतुआ या मालिकेत आता आणखी एक नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे.

लवकरच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची एन्ट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले हे तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पीढीसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मालिकेत मल्हार कामत सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहे. एकीकडे वैदेहीच्या आठवणी तर दुसरीकडे लेकीचा शोध सुरु असताना पंडितजींच्या येण्याने मल्हारच्या आयुष्यात नेमकं कोणतं वळण येणार? स्वराच आपली मुलगी आहे का हे सत्य मल्हारसमोर उघड होणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, अवनी तायवाडे, प्रिया मराठे या कलाकारांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

हे ही वाचा:

प्रेम आणि विश्वास याचा समतोल साधत ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Happy Birthday Rekha : रेखासोबत सहकलाकाराने गैरवर्तन केल्या प्रकरणी बिग बी संतापले…

India-Africa ODI Series : श्रेयसने शतक ठोकले तर, ईशानने रोहित व गांगुलीला विक्रम मोडला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss