spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : Ashadhi Ekadashi निमित्त मुंबईच्या प्रतिपंढरपुरात जमली नेत्यांची मांदियाळी

आज (१७ जुलै २०२४) आषाढी एकादशी म्हणजेच मोठी एकादशी या एकादशीला समूळ भाविक मेळा हा पंढरपुरात दाखल होऊन विठ्ठलाची आणि रुक्मिणीची भेट घेतात. त्याचप्रमाणे आपापली मनोकामना मागतात. असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला भेट देता आली पाहिजे. मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असून ४०२ वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे विश्वस्त सांगतात. या मंदिराच्या स्थापनेविषयीची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. वडाळा गाव हे एक बेट होते. वडाळा या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर स्थापन झाले म्हणून या मंदिराला ‘प्रतिपंढरपूर’ देखील संबोधले जाते. दरम्यान आज या प्रतिपंढरपूरला भेट देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठमोठ्या नेत्यांनी या मंदिरला भेट दिली. यावेळी तेथे खासदार अरविंद सावंत ,वर्षा गायकवाड आणि राजीव गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली. प्रत्येकानेच या संपूर्ण ममंदियाळी विषयी विशेष असे मार्गदर्शन व स्वतः च्या भावना व्यक्त केल्या.

आजच्या दिवसाविषयी शिवसेना नेते राजीव वाघमारे काय म्हणाले ?

वारकऱ्यांचा संदेश आम्ही सर्वानी घेणे गरजेचे आहे. वारकरी हे त्यांची संस्कृती मोठ्या पाटलावर जपताना दिसत आहेत. धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुता हे आम्ही त्यांच्या कडून शिकून द्यावी. वारकऱ्यांच्या मार्गावर आपण चालले पाहिजे. पंढरपूर प्रतिकृती असलेल्या मंदिराविषयी सांगताना म्हणाले की – ” हे मंदिराच्या स्थापनेची विट हि संत तुकाराम यांनी बसवली आहे. म्हणून याला प्रतिपंढरपूर असे ओळखले जाते. त्यामुळे आम्ही शिंदे सरकारने येथे स्थित असलेल्या मोनोरेल स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर, दादर पूर्व असे ठेवण्यात येणार आहे. नाव बदलण्यासंदर्भाचे पहिला आंदोलन हें मीच सुरु केल होत. आता या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्वाची पावले उचलणार आहेत. लाडका भाऊ योजनेची घोषणा सकाळी केली त्याबद्धल ते म्हणलेले कि ” आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व जनमानसाला घेऊन पुढे चालत आहेत.”

या सर्व योजना तर चांगल्या आहेत परंतु त्याविषयी असं बोललं जात आहे की या निरनिराळ्या योजनांमुळे देशाचं अर्थकारण ढासळत आहे. यावर ते म्हणाले – “विरोधक यांना फक्त काहींना काही उणीवा शोधून काढायच्या आहेत.  म्हणून हा सर्व त्यांचा प्रयत्न आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्याचा जो GDP त्यातील २५% पर्यंतचे कर्ज हे कोणताही राष्ट्र घेऊ शकतो. आपले कर्ज हे केवळ ८ लाख कोटी रुपये इतकेच आहे म्हणजे केवळ १८% इतकेच आहे. आपलं जे उत्पन्न आहे ते ३७ लाख कोटी ने वाढलं आहे. कर्ज काढून उत्पन्न वाढवत राज्य चालूयात. कोणीही काळजी करू नये.” आमचे मुख्यमंत्री देणारे आहेत घेणारे नाही. विकास तर आम्ही करतोच आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये.” असे म्हणाले.

शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत याविषयी काय म्हणाले ?

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अरविंद सावंत यांनी ” जसे ते वारकरी आहेत तसे आम्हीसुद्धा वार करी आहोत. जसा त्यांचा विठू पंढरपुरात आहे तसा आमचा विठु बंदराला आहे. ” असा खडेबोल विरोधकांना सुनावला. यावेळी त्यांनी त्याच्या जुन्या आठवांणींना उजाळा दिला. तसेच तो विठ्ठल विटेवर उभा आहे तीच विट जरा विठ्ठलाने जरा यांच्या डोक्यावर मारावी जेणेकरून त्यांना सुबुद्धी येईल. असे ते म्हणाले पुढे ते म्हणाले कि जस काल (१६ जुलै) शन्कराचार्यांनी सांगितले की वाचन भंग करणारा हिंदू असू शकत नाही, पाठीत सूर खुपसणारा हिंदू आसू शकत नाही. त्याचप्रमाणे तो पांडुरंगाचा भक्त असूच शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठी माणसाने जग होण्याची आवश्यकता आहे. त्याकाळात मार्मिक मध्ये वाचा आणि थंड बसा हा लेख आला होता तशी काहीशी अवस्था यांची झाली आहे असं मला वाटत”

त्याचप्रमाणे उत्तरमध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या ?

“आम्ही प्रत्येकवर्ष प्रतिपंढरपूरला भेटी देतो. इकडचं वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते. आज मी माऊलीच्या नामगजरात  मंजुळासुद्धा  वाजवल्या. पंढरपूरला जायची जी भावना आहे ती इथे आल्यावर पूर्ण होते. यावेळी इथे जत्रा शुद्धभारते आणि प्रत्येक पक्षाचे लोक इथे आपला एक टेन्ट लावतात. सर्व एकदिलाने भेटतात.” विधानसभेच्या निवडणुकी बाबत बोलताना त्या म्हणाल्या कि ” जनताही सुज्ञ आहे. यंदा घोषणा आणि पैशांचा पाऊस मोठ्याप्रमाणावर होत आहे. त्यामुळे लोकांना सुद्धा कळतंय कि कोणाच्या अफवांना आपण बाली पडत आहोत. मागच्याही वर्षी अशी आश्वासन दिली होती त्यातली पूर्ण किती झाली हे सर्व जाणतातच. शिवाय मागचे २ वर्ष हा विचार त्यांच्या मनात का नाही आला हा मजा त्यांना प्रश्न आहे. या योजना आता काही दिवसांनी जुमला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss