Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

येणारी विधानसभा निवडणुक सगळ्याच राजकीय पक्षांचे अस्तित्व पणाला लावणारी असणार आहे. “एक तर तू राहशील नाही मी” अशी जगण्या-मरण्याची लढाई या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. ‘तू मला संपवायला निघालास मी तूला संपवल्याशिवाय राहणार नाही’, या शब्दात सगळ्यांनीच रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे ही निवडणूक.रक्तरंजित होईल त्याची एक झलक महाराष्ट्राने काल पाहिली. महाराष्ट्र जन हो… उठा उठा निवडणूक आली रक्त स्नाची वेळ झाली.

बदलापूर (Badlapur) अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या गोळीबारात झालेला मृत्यू पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. एका गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला बेड्या लावणे बंधनकारक असतांना हा आरोपी पोलिसांची बंदूक हिसकावून घेतोच कशी? पोलिसांवर गोळीबार का केला? पोलिसांची रिव्हॉल्वर कमरेला लावलेली असतांना ती लॉक केलेली असते तर मग अक्षयने ती रिव्हॉल्वर अनलॉक केलीच कशी? सरळ डोक्यातच गोळी कशी लागली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बदलापूरात या घटनेनंतर फटाके फुटले तर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फूटत आहेत. बदलापूर प्रकरणात सरकारची प्रतिमा मलिन झाली होती त्यामुळे या घटनेबाबत सरकारची भूमिका आरोपांच्या पिंजऱ्यात उभी आहे. सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अक्षय शिंदे आपल्या आई वडिलांना भेटला होता. यावेळी अक्षयने एका वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखाचे कात्रण आपल्या आईस दाखवले होते. त्या कात्रणाबाबत अक्षय आपल्या आईला काहीतरी माहिती देणार होता. मात्र, अक्षयच्या आईला कात्रणाबाबत काहीही कळले नाही म्हणून त्यांनी अक्षयला तो कागद फेकून दे असे सांगितले होते. त्यानंतर अक्षयने हा कागद परत आपल्या खिशात ठेवून घेतला होता. दरम्यान त्या कात्रणामध्ये एन्काऊंटरचा उल्लेख होता अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्या गोळीबारात सिनेस्टाईल मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मरक्षणसाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला त्यांच्या पायाला गोळी लागली. अक्षय बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असून हा गुन्हा त्याच्या पत्नीने दाखल केला होता. याच प्रकरणातील संस्थेचे दोन पदाधिकारी फरार असून त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे ही सगळी घटना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात असून ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी या प्रकरणात घडत आहेत त्यावरुन ही स्क्रिप्ट नेमकी कुणाची? याचा अंदाज राजकीय वर्तुळात घेतला जात आहे. अशा अनेक घटना या पुढील काळात घडण्याची शक्यता असून ही निवडणूक रक्तरंजित असणार याची ही झलक आहे. काही सरकार पुरस्कृत तर काही सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडू शकतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यामुळे ही अक्षय शिंदे एन्काऊंटरची स्क्रीप्ट गृह विभागाची की धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी काम करणाऱ्या चाणाक्यांची ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

हे ही वाचा:

सुप्रिम कोर्टाचा निर्णय देशाच्या बेसिक स्ट्रक्चरविरोधात; आरक्षणावरून Prakash Ambedkar यांचे मोठे वक्तव्य

कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version