spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चाकरमानी रस्त्यातच आणि गणपती कारखान्यातच!

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे सालाबादप्रमाणे याही वेळा प्रचंड हाल झाले. ज्या प्रवासाला 7 ते 8 तास लागतात त्यांना 24 तास 25 तास लागले. गणपतीची मुर्ती घरी आणण्यासाठी पोहचू न शकलेल्या चाकरमानी रस्त्यात आणि गणपती कारखान्यात अशी परिस्थिती ओढवली. मुंबई- गोवा महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार संपल्या संपल्या संपत नाहीत. सरकारने केलेले सगळे प्रयत्न कमी पडले. रस्त्यावर खड्डे, वाहतूक खोळंबा, माणगाव, लोणेरे येथे ट्राफिक जाम यामुळे मुंबईवर निघालेल्यांंचे प्रचंड हाल झाले. पहिला फटका एसटी संपाचा बसला. संपामुळे महाराष्ट्राच्या अन्य डेपोच्या गाड्या मुंबई, ठाण्यात पोहचायला वेळ लागला त्यामुळे एसटीने जाणाऱ्यांना जागेवरच पाच ते सहा तास खोळंबून रहावे लागले. भाजपा, शिवसेना सह सगळ्याच पक्षांनी मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिल्या पण मुंबई- गोवा महामार्गावर रायगडमध्ये जिथे कामे अपुरी पडलेली आहेत तिथे प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. पाच ते सहा तास एकाच ठिकाणी रांगेत उभे राहावे लागले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्या होत्या. तर सुकेळी येथे दोन एसटीची धडक झाली, कशेडी बोगद्याजवळ कंटेनर आणि दोन एसटी बस यामध्ये धडक झाली. त्यामुळे सर्व गाड्या रखडल्या होत्या. 5 आणि 6 सप्टेंबरला रात्री उशिरा सुटलेल्या एसटी बस दुसऱ्या दिवशी 18 ते 20 तासाने पोहचत होत्या. रस्त्यावर पाणी नाही, खाण्याचे अन्नपदार्थ संपले असे हाल सहन करत प्रवास करावा लागला. जागोजागी खेळखंडोबा झालेले प्रवासी प्रचंड संताप व्यक्त करत होते, तर काही जण सरकार विरोधातील रोष सोशल मिडियावर व्यक्त करत होते.

वास्तविक सरकारने केलेले दावे फोल ठरले. या मुंबई- गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. माणगाव येथे बाजारपेठेच्या बाहेरून निघणारा पुलाचे काम तेरा वर्षानंतर आता सुरु झाले आहे. लोणेरे, नागोठणेसह अनेक गावातील उड्डाण पूल अपुरे पडले आहेत. माणगाव, गोरेगाव या भागात मुळचा जुनाच रस्ता आहे. तिथे अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बाँटल नेक तयार झालेत व एकाच वेळी वाहने आल्याने खोळंबा होतो. यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज असते. काही वाहने अंतर्गत मार्गावरुन वेळीच वळवावी लागतात, त्यासाठी वाहतूक पोलीसांनी प्लॅनिंग करण्याची गरज असते, असे कुठलेही नियोजन दिसून येत नव्हते. विशेष बाब म्हणजे गुगल मँपवर ट्रॅफिक जाम दाखवत नसल्याने मुंबई, ठाण्यातून निघणाऱ्या वाहनांना पुढची कल्पना येत नव्हती त्यामुळे तेही पुढे जाऊन ट्रॅफिकमध्ये फसत होते.

एसटी महामंडळाच्या गाड्या परिस्थिती पाहून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अथवा, पाली- निजामपूर मार्गे वळवण्याची गरज होती. त्यासाठी पोलिसांनी सातत्याने पुढची परिस्थिती पाहून पनवेल जवळच नियोजन करण्याची गरज होती पण तसे न केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने हा सगळा खेळखंडोबा झाल्याचे पहायला मिळत होते. विशेष म्हणजे जे हाल झाले तिथपर्यंत टिव्ही मिडिया पण पोहचू शकला नाही त्यामुळे त्याची दाहकता टिव्हीवर दिसली नाही. जे प्रवास करीत होते त्यांनाच ते कळत होते. वेळेचे नियोजन पुर्ण फसलेले चाकरमानी सरकारच्या नावाने कोकणी शिव्या हासडण्यापलीकडे काहीच करु शकत नव्हते, असे चित्र दिसून येत होते.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss