spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : Sindhudurg विमानतळ फ्लॉप प्रोजेक्टच्या प्रश्नावर Nilesh Rane यांचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगत आहेत. ही निवडणूक येईपर्यंत अनेक पैलू उलगडताना दिसत आहेत. अशातच टाईम महाराष्ट्रचे(Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी देशाचे माजी खासदार निलेश राणे यांची फेस टू फेस मुलाखत घेतली आहे. यंदा विधानसभेच्या निवडणूक युध्दातच स्वतःचा राजकीय वनवास संपवण्यासाठी डॅा. निलेश राणे उत्सुक आहेत. कुडाळ- मालवण मतदार संघात सध्या ठाकरेंचे वैभव नाईक आमदार आहेत. अश्या स्थितीत पुन्हा कमबॅक करण्यास उत्सुक असलेल्या निलेश राणेंना ‘ व्हिलन’ ठरवणं हा कोकणातला अजेंडा बनवला गेलाय. त्याबद्दल सांगतायत स्वतः माजी खासदार निलेश राणे. या वेळी त्यांनी Sindhudurg विमानतळ फ्लॉप प्रोजेक्टच्या प्रश्नावर Nilesh Rane यांचा गौप्यस्फोट करत याही विषयाला हात लावला आहे. जाणूयात ते नेमके काय म्हणाले आहेत.

काय म्हणतात निलेश राणे ?

“आम्ही २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो. त्यांनतर आम्ही स्वाभिमान पक्ष काढला. त्याच्या तिकिटावर म्हणण्या पेक्षा त्याच्या फक्त फॉर्मवर मी निवडणूक जिंकून आलो. त्यावेळी मी कोणत्या पक्षात नव्हतो. २०१९ साली आम्ही BJP मध्ये समाविष्ट झालो. साधारणतः साडेसात वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. पाच वर्ष ज्यावेळी फडणवीस साहेब सत्तेत होते .. कॅबिनेट मध्ये पोहोचल्यावर स्वतःच मत मांडण्यासाठी धमक, कसब आणि रुबाब लागतो. असं किती लोकांनमध्ये आहे. हेच स्वतःच मत ठासून सांगणारं एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी राणे हे कॅबिनेटमध्ये होते त्यावेळी उसाला भाव देताय, कापसाला भाव देताय तर मग माझ्या भात शेतीलासुद्धा भाव द्यावाच लागणार. नाहीतर कॅबिनेट पुढे जाणार नाही. एकीकडे न्याय आणि एकीकडे अन्याय हे योग्य नाही. म्हणजे काय यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की कॅबिनेटमध्ये कोकणाला न्याय नाही मिळाला. असं सांगणारा असं बोलणारा एक तरी व्यक्ती हा असायलाच पाहिजे. नेते कधी नाही म्हणत नाहीत काम करायला, पण सांगणारा कोणीतरी पाहिजे. कदाचित त्या वर्षांनमध्ये प्रेझेंटेशन करणार आणि इम्प्लिमेंटेशन यांच्याकडे दुर्लक्ष झाला. आम्ही राणे म्हणून का भांडतो .. निलेश, नितेश आणि नारायण राणे हे कधी स्वतःसाठी भांडले नाही तर ते नेहमी दुसऱ्यांसाठी लढले. आमच्या कोणाच्याही नावावर कोणताच कॉन्ट्रॅक्ट नाही. वाईटपण अंगावर घेणार कोणी पाहिजे त्यामुळे आम्ही ती जबाबदारी घेतली आहे. आता सोशल मीडिया पहिला तर लक्षात येईल कि लोक कन्टेन्ट पेक्षा खालचे कॉमेंट वाचण्यात इंटरेस्टेड असतात. जर मी ही पोलखोल करायला गेलो ना तर मी सर्वच बाहेर येईल.”

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss