Friday, July 5, 2024

Latest Posts

Exclusive: शिवसेनेनं गाठलं भगव्या नव्हे हिरव्या विजयाचं लक्ष्य, Muslim मतदार कोणाचे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या ३ मतदारसंघामध्ये विजय मिळवला. त्याचं श्रेय मुस्लिम मतदारांना गेल्याच आकडेवारीवरून दिसतयं.

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी अग्रेसर असल्याचे पाहायला मिळाले. राज्यामध्ये महाविकास आघाडीला ३१ जागांवर विजय मिळाला असून महायुतीच्या उमेदवारांना १७ जागा मिळाल्या आहेत. यावर्षीची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची होती कारण, शिवसेना गट हा दोन विभागांमध्ये विभागला गेला होता एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा म्हणजे शिवसेना ठाकरे गट. पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. दरम्यान, या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाल्याची चर्चा होती. या चर्चेला खरं उत्तर ४ जून रोजी मिळाले. निवडणुकीचा निकाल समजल्यानंतर मुस्लिम मतदार ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या विजयामध्ये मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव मुस्लिम आपल्या पाठीशी असल्याचा दावा करत होत्या पण अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अरविंद सावंत यांना ५२ हजार ६७३ मते मिळाली आहेत. अरविंद सावंत यांच्या विजयामध्ये भायखळा तसेच मुंबादेवीच्या मुस्लिम समाजाच्या मतदारांचा हात आहे. मुस्लिम बहुल मुंबादेवी विधानसभेतून काँग्रेसचे आमदार अमिन पटेल आहेत. त्या जागेवरून अरविंद सावंत यांना ७७, ४६९  मते मिळाली तर जाधव यांना केवळ ३६ हजार ६९० मते मिळाली आहे.

 

याशिवाय, उत्तर पूर्व मुंबई मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ईशान्य मुंबई मतदार संघातून उज्वल निकम यांचा पराभव केला. उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या दोघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीमध्ये कोणाचा विजय होईल हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते कारण उज्वल निकम हेच आघाडीवर दाखवले जात होते. परंतु शेवटी निकाल लागला आणि त्यामध्ये वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. वर्षा गायकवाड यांच्या मागे सुद्धा मुस्लिम मतदारांचा मोठा आधार असल्याचा पाहायला मिळालं. वर्षा गायकवाड यांनी १६,५१४ मतांनी उज्वल निकम यांचा पराभव केला. कुर्ला चांदीवली वांद्रे पूर्व आणि वांद्रा पश्चिम या भागामध्ये वर्षा गायकवाड यांनी कमालीची जादू केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. चांदीवली विधानसभेत वर्षा गायकवाड यांना १०२९८५ मते मिळाली तर उज्वल निकम यांना ९८,६६१  मते मिळाली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या ३ मतदारसंघामध्ये विजय मिळवला. त्याचं श्रेय मुस्लिम मतदारांना गेल्याच आकडेवारीवरून दिसतयं. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय पाटील या तीन उमेदवारांनी मुस्लिम मतदारांमुळेच विजय मिळवता आला. काँग्रेसचा मतदार म्हणून ओळखला जाणारा मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. हा मतदार विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या पाठीशी निष्ठेने उभा राहिला तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर दिसेल.

हे ही वाचा:

Monsoon Updates: मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, कधी आणि कुठे?

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss