spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Fadnavis आणि Bawankule ठाम! शेंगा खाल्ल्या नाही, मग टरफले का उचलावी?

मी शेंंगा खाल्ल्या नाही मी टरफले उचलणार नाही.. असा बाणेदारपणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दाखवून अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर मान झुकवली नाही. त्यांनी असे न केल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही आपला कणा ताठच ठेवला. महाराष्ट्र भावनिक आहे. विषय श्रध्देचा आहे. तरीही फडणवीस झुकले नाही हाच त्यांचा बाणेदारपणा भाजपाला नडला आणि लोकसभा निवडणूकीत पक्ष सडकून पडला.

मालवण (Malvan) मधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कोसळला त्याचे व्रण इतक्यात बरे होणारे नाहीत. महाराष्ट्र हळवा आहे भावनिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या युगपुरुषांच्या बाबतीत तर महाराष्ट्र कधीच कुठली बाब खपवून घेत नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी घडली ती चुक नव्हती तो गुन्हा आहे. हा गुन्हा केवळ पुतळा उभारणाऱ्या आपटे आणि चबूतऱ्याचे स्ट्रक्चरल आँडिट करणाऱ्या पाटील या दोघांनीच केलेला नाही. या गुन्ह्यात संपूर्ण सरकार आणि संपूर्ण प्रशासन दोषी आहे. कारण विषय एका भिंतीचा किंवा इमारतीचा नाही. विषय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आहे. त्याचे गांभीर्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ओळखले आणि ते महाराजांसमोर नतमस्तक झाले. पण या घटनेचे गांभीर्य अजूनही महाराष्ट्र भाजपाने ओळखलेले नाही. अजूनही भाजपा (BJP) च्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला हा विषय महत्त्वाचा वाटत नाही असेच चित्र पहायला मिळते आहे. या प्रकरणी पहिल्यांंदा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार  (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राची माफी मागितली. मग उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माफी मागितली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) म्हणाले, मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे. त्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली.

माफी मागण्याने कोणी छोटा होत नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर झुकणे हे सगळ्यांचे आद्य कर्तव्यच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ओळखले आणि ते स्वतः नतमस्तक झाले. महाराष्ट्र भाजपाचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकावे लागले आणि पक्षाला सावरावे लागले. महाराष्ट्र भाजपाचे नेतृत्व या प्रकरणात पुर्ण अपयशी ठरले आहे. एक तर भाजपाचे नेते बांधकाम मंत्री सार्वजनिक रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे आज अखेर हेच सांगत आहेत की, पुतळ्याची सर्वस्वी जबाबदारी नेव्हीची आहे. यामध्ये नेव्हीचाच दोष आहे. त्यामुळेच सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून आम्ही कुठेही चूकलो नाही असेच आजपर्यंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते आहे. त्यामुळे जर ते चुकले नसतील तर मग माफी तरी कशाला मागतील? नरेंद्र मोदी यांना मात्र वाटले की जे घडले ते चूक आहे त्यामुळे त्यांनी महाराजांसमोर मान झुकवली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असाच बाणेदारपणा वारंवार दाखवला आहे. बदलापूरच्या घटनेतही गृहमंत्री म्हणून हाच बाणेदारपणा त्यांनी दाखवला. अशा अनेक घटना सांगता येतील कोल्हापूरात ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 1 लाख बहिणी महाराष्ट्रातून गायब झाल्या, जरांगे यांच्या आंदोलनावर तीव्र लाठीमार झाला. भर दिवसा रस्त्यावर महिला- भगिनींंची लूटमार, विनयभंग आणि सामुहिक बलात्कार झाले. अशा अनेक घटना दहा वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना घडल्या पण कधीच त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची चूक नव्हती. ते अथवा त्यांचे पोलीस कधीच चुकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कधीच कुणाची माफी मागायची गरज नाही. ते विरोधी पक्षात होते तेव्हा मात्र विधानसभेत पदोपदी तत्कालीन सरकारला माफी मागायला सांगत होते.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख 26/11 च्या हल्यानंतर म्हणाले होते की, तुम्ही कितीही दबाव आणा पण दिल्ली माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझे काही कोणी बिघडवू शकत नाही. पण त्यावेळी जो संताप लोकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला तेव्हा विलासराव देशमुख यांना राजिनामा द्यावा लागला होता. त्यांच्या दिल्लीला महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेसमोर झुकावे लागले होते. येथे नरेंद्र मोदी आणि आशिष शेलार यांची भाजपा महाराजांसमोर झुकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार पण चूकले आणि झुकले. पण फडणवीस आणि बावनकुळे यांच्या भाजपाने ठरवले आहे की, आम्ही झुकणार नाही, आम्ही शेंगा खाल्ल्या नाही आम्ही टरफले उचलणार नाही, असे चित्र पहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss