Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Milind Narvekar Property : अरेरे! दहावी पास मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नेमकं कुठलं रेशन कार्ड?

लोकसभा निवडणूक, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

लोकसभा निवडणूक, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका १२ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी उमेवारी अर्ज दाखल केला आहे. मिलिंद नार्वेकर हे दहावी पास असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातून उघड झाले आहे.

मिलिंद नार्वेकर त्यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रक्कम आहे. तर मिलिंद नार्वेकर यांनी 50 हजार तर पत्नीने 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये म्युच्युअल फंड व बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये त्यांचे 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये आहेत.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने – नार्वेकरांकडे 355.94 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 24 लाख 67 हजार 981 रुपये आहे. चांदी 12.56 किलोग्रॅम असून त्याची किंमत 9 लाख 74 हजार 656 रुपये आहेत. हिऱ्यांची किंमत 36 लाख 85 हजार 552 रुपये आहे. एकूण दागिन्यांची किंमत 71 लाख 28 हजार आहे. त्यांच्या पत्नीकडे 425 ग्रॅम सोने किंमत 29 लाख 26 हजार 21 रुपये, चांदी – 6.26 किलो किंमत 4 लाख 85 हजार 776 रुपये तर 33 लाख 49 हजार 623 किमतीचे हिरे आहेत. त्यांच्या पत्नीकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत 67 लाख 61 हजार 420 रुपये आहे.

शेअर मार्केटमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक – मिलिंद नार्वेकर यांनी शेयर मार्केटमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे श्री बालाजी कॉम एलएलपी कंपनीत स्वतःचे 10 कोटी 11 लाख 28 हजार 152 तर, पत्नीची एकूण रक्कम 31 कोटी 25 लाख 33 हजार 560 रुपये आहेत.

मिलिंद नार्वेकर यांचे ‘अदानी’ पोर्ट्स सहित अनेक कंपन्यामध्ये शेयर्स आहेत. मलिंद नार्वेकर कुटुंबाची कोकण आणि बीडमध्ये जमीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (ता. दापोली) येथे 74.80 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये पत्नीचा 50 टक्के वाटा आहे. तसेच बंगळूर येथे पत्नीच्या नावावर जमीन व पत्नीच्याच नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस आहे. नार्वेकरांची स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63, हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे. पण, पाली हिल इथं राहत असलेलं घर मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर अथवा बायकोच्याही नावावर नाही. नार्वेकरांकडे एकही वाहन नाही.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss