Thursday, July 4, 2024

Latest Posts

Exclusive : वैदर्भीय नाना पटोले Mumbai क्रिकेटच्या पीचवर, पवार- शेलारांचा पटोलेंसाठी ‘पटा-ले’फॅार्म्युला

MCA ची एक संस्कृती आहे. पक्ष कोणताही असो , मात्र फायदा हा क्रिकेटचाच होणार. त्यामुळे या संस्कृतीनुसारच सर्व नीट घडेल. "

Mumbai Cricket Association (MCA)च्या अध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेते राहिलेले आहेत. अगदीच आशिष  शेलार, शरद पवार, मनोहर जोशी, इत्यादींसारखे अनेक अध्यक्ष म्हणून निवडून आले. आता यांच्या सोबत अजून एका व्यक्तीचे नाव पुढे येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी क्रिकेट विश्वातील मोठ्ये नाव शहाआलम (Shah Alam) यांना भेटले असता अनेक नव्या गोष्टी पडद्या समोर आल्या आहेत. जाणूयात सविस्तर.

याआधी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)यांना या अध्यक्षपदी शहाआलम यांनीच आणले होते. आणि आता एक नवा चेहरा समोर येणार आहे. त्यासंदर्भात त्यांनां विचारले असता ते म्हणाले की –
“या पूर्वी मी विलासराव देशमुख यांना आणलं होत. माझा यामागे एकच ध्येय आहे की असोसिएशनमध्ये क्रिकेटर आणि लोकांचा फायदा झाला पाहिजे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी विलासराव देशमुख यांनी मोठ्ये काम केले हे आपण सर्वांनीच पहिले आहे. त्यांच्या निधनांनंतर मुंबई क्रिकेट असोशिएशन अक्षरशः पोरके झाले होते. तससच त्याकाळात मी गोपिनाथ मुंडे यांनाही आणलं.कारण सर्वसामान्यांचे फायदे व्हावे यासाठी मी त्यांना आणलं. MCA ला याचा काहीतरी फायदा व्हावा म्हणून या राजकीय नेत्यांना अध्यक्ष म्हणूंन आणले होते. आता पर्यंत सर्व मोठे नेते अध्यक्ष बनले आहेत. त्यात आतापर्यंत माझ्या पक्षाचा नेता नव्हता त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांच्यासारखा दिग्गज लोकांच्या कामाचा नेता बनतील अशी माझी खात्री आहे. त्यामुळेच त्यांनां अध्यक्ष पदासाठी मी घेऊन आलो आहे.” असे शहा यांनी सांगितले.

या आधी नागपूरचे अमोल काळे यांना क्रिकेट विषयी काहीही माहिती नव्हते. तरीही त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अध्यक्ष पदी बसवले होते. त्याचा परिणाम म्हणजे त्या दिड वर्षाच्या कालावधीत क्रिकेट विश्वात फारसा काही बदल घडून आलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे आता नाना पटोले यांनाही कोणत्याही प्रकारचा क्रिकेटविश्वाचा अनुभव नाही. मग त्यांना या पदी बसवण्याचा अट्टाहास का केला ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की –
“मी जॉईंट सेक्रेटरी असताना ३७ जागेवरती गव्हर्नमेंट जागा मागितली आहे. जस मानखुर्दमध्ये ३७ एकराची जागा मी मागितली होती. माझी कल्पना अशी होती की आझात मैदान येथे फ़ुटबाँल प्लेयर आणि टेनिसप्लेअर यांच्यासाठी मैदान तयार करावा. पण तिथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात किंवा मोर्चे येतात या मुले क्रिकेट खेळताना व्यत्यय येतो. या ३७ एकरमध्ये आम्ही ४० ग्रॉऊंड बनवणार होतो. आणि तिकडे क्रिकेट टूर्नामेंट तसेच MCA च टूर्नामेंट एकाचवेळी एकाच ठिकाणी घडून आणू शकतो. ही जागा ज्यावेळी महाविकास आघाडीकडे मागितली होती त्यावेळी या संपूर्ण जागेसाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पाटोले यांनी खूप मदत केली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना MCA मधील ९०% माहिती आहे. ते मला भेटायला आले होते त्यावेळी ते MCA च्या सर्व लोकांनासुद्धा भेटले. त्यांचं वागणं, स्वभाव हा सर्वांना आवडला होता. त्यामुळे आमची सर्वांची अपेक्षा आहे की जर नाना पदावर आले तर आम्हा सर्वांचाच फायदा हा निश्चितच होईल. “

नाना पटोले यंदा काय वेगळं करणार MCAसाठी?

या प्रश्नावर शहआलम म्हणले की – “माझी आतापर्यंतची अगदी आझाद मैदानातील चपराशी पासून ते MCA चा मेंबर इथवरच प्रवास सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आतापर्यंतमी आणलेला एकही अध्यक्ष असा नाही ज्यामुळे MCA तोट्यात गेली आहे. त्यामुळे सर्वानी माझ्यावर विश्वास ठेवा. यामध्ये कोणतेही राजकीय भांडण नाही. MCA ची एक संस्कृती आहे. पक्ष कोणताही असो , मात्र फायदा हा क्रिकेटचाच होणार. त्यामुळे या संस्कृतीनुसारच सर्व नीट घडेल. “

२३ जुलै २०२४ रोजी ही निवडणूक होणार आहे. यात मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), संजय नाईक (Sanjay Naik), नाना पाटोले (Nana Patole) अशी लढत आमनेसामने होणार आहे. ही लढत तिरंगी होणार की दुरंगी होणार आहे.  हे पाहणे औत्सुक्याचे असेल. या तिघांनशीही शहाआलम यांचे फार चांगले संबंध आहेत. या सर्वातून त्यांना नेमके काय सध्या करायचे आहे. असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले – माझे कितीही चांगले संबंध असूदेत तरीही मला नाना पटोले यांनाच रेप्रेझेन्ट करायचे आहे. आता निवडणूक लढवायची कि नाही हा निर्णय सर्वस्वी नाना व पक्ष यांचाच असणार आहे. हा निर्णय एकमताने होणार असल्याचे त्यांनी संगीतले आहे.

तुम्ही आम्ही वाटून घाऊ असा काळ जर मुंबई क्रिकेटवर आला, तर हा काळ काहीसा कसोटीयुक्त असेल. आता हे पाहणे औत्सुक्याचे असेल की मिलिंद नार्वेकर, संजय नाईक, नाना पाटोले यांच्यातील कोण MCA च्या अध्यक्षपदी येणार.

हे ही वाचा:

VIDHAN PARISHAD ELECTION : ज्येष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांना दिला बुस्टर डोस ; अर्ज भारण्यापूर्वी माध्यमांशी साधला भावुक संवाद

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss