spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis

वाढवणं बांदरानिमित्त आज (२० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. या मार्गक्रमणाचा पहिला टप्पा हा  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला ते भेट आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरसाठी रवाना झाले आहेत, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केले आहे. ते काय म्हणाले पाहुयात ..

नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : 

“आजचा दिवस हा इतिहासातील सुवर्ण हस्ताक्षराने लिहिणारा आहे. मुंबई व हा सर्व भाग हा आर्थिक राजधानी झाला कारण मुंबई पोर्ट आणि जीएनपिटी पोर्ट मूळे आपण नंबर १  बनलो. आता पुढील ५० वर्ष हे आपण म्हणजे महाराष्ट्र हा नंबर वन राहणार आहे. आणि हे होणार आहे नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता पालघर मधील या बंदरामुळे मेरीटाइन पावर बनेल. १९९१ मध्ये सुप्रीम कोर्टाने यासाठी नोटिफिकेशन काढलं पण त्यावर आक्षेप घेऊन शेवटी जन्माच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर असं संगितलं कि हा पोर्ट बनणारच नाही. पण २०१४ मध्ये मोदी सरकार आलं आणि याला एक रास्ता करून दिला. यामुळे कोणताही प्रकारचे नैसर्गिक नुकसान होणार नाही. हा प्रकल्प भर आला आणि त्याला नेशनल पोर्ट असं नाव दिल. आज वाढवणं बंदराचा शिलान्यास तुमच्या हाताने होत आहे. पुढील २०० वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहास रचेल. भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज हा क्षण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. यानिमित्ताने मी एक सुचवूं इच्छितो की देशातील सर्व मोठ्या एअरपोर्ट यांचं रेक्लमेशन करून ३ रा मोठा एअरपोर्ट आपण इथे बानवू शकतो. जर असं झालं तर मुंबई पूर्ण बदलेले. या प्रकल्पाच मुख्य उद्दिष्ट आहे की जी फिशिंग कम्युनिटी आहे यांचा विचार करूनच केला आहे. त्यांच्या साठी सर्व पद्धतीने यांच्याकडे अर्थ पाठबळ राहील. येतील आदिवासी आणि मच्छीमार भावांना ट्रेनिंग देऊन इथे काम सुद्धा उपलब्ध होणार आहे. इथे जवळ जवळ १ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे.  जेएनपीटी ने याच ट्रेनिंगसुद्धा सुरु केलं आहे.”

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss