राणेंच्या हाती लवकरच भगवा, BJP मध्ये जे मिळणार नाही त्यासाठी राणेंचा सेनाप्रवेश

राणे ब्रँडच्या या हालचालीमुळे राणे पुन्हा शिवसेनेत जाणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेत राणेंची पुन्हा एंट्री होणार का? राणे ब्रँड पुन्हा एकदा शिवसेनेत झळकणार का?

राणेंच्या हाती लवकरच भगवा, BJP मध्ये जे मिळणार नाही त्यासाठी राणेंचा सेनाप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुक जवळ येऊन ठेपल्याने आजूबाजूचा राजकीय माहोल तापायला लागला आहे. तर महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आपण कोणत्यातरी एका बोटीत बसायला हवं म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्या पक्षातील नेत्यांनी स्वतःला हाय अलर्ट लावून घेतले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील राजकारणामधील फायर ब्रँड असलेल्या ‘राणे ब्रँड’ हासुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. राणे ब्रँडच्या या हालचालीमुळे राणे पुन्हा शिवसेनेत जाणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेत राणेंची पुन्हा एंट्री होणार का? राणे ब्रँड पुन्हा एकदा शिवसेनेत झळकणार का? या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ब्रँड आहेत, मग तो ठाकरे ब्रँड असेल, पवार ब्रँड असेल, देशमुख किंवा पाटील ब्रँड असेल तसाच एक ब्रँड आहे तो म्हणजे राणे ब्रँड. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातील खासदार असलेले नारायण राणे यांनी स्वतःच्या कष्टाने आणि महत प्रयासाने महाराष्ट्रात स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला आहे. नारायण राणे यांनी गेली ४० ते ४५ वर्षे महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असताना अगदी शिवसेनेचा एक शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार अशा पद्धतीचा त्यांचा जो काही राजकीय प्रवास आहे तो खूप मोठा पल्लेदार आहे. नारायण राणे जेव्हा शिवसेनेत कार्यरत होते तेव्हा त्यांच्यावर काही कारणास्तव कारवाई झाली आणि २००५ साली त्यांना शिवसेनेतून बाहेर जावे लागले होते. त्यानंतर शिवसेनेचा सगळ्यात मोठा स्पर्धक किंवा शत्रू म्हणून नारायण राणे उभे राहिले आणि ते भाजपमध्ये आहेत. त्यातच राणेंची दोन्ही मुले निलेश राणे आणि नितेश राणे महत्वाकांक्षेने काम करताना दिसत आहेत. यांपैकी नितेश राणे यांनी राज्यभरात प्रचंड गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू-मुस्लिम या दोन धर्मांमध्ये केलं जाणारं भाष्य, त्यातून झालेली राजकीय आणि धार्मिक तेढ आणि नितेश राणे यांनी त्यावर घेतलेली भूमिका प्रचंड गाजली होती.

राणे कुटुंबातील तिसरे राणे म्हणजेच डॉ. निलेश राणे यांचा खासदार म्हणून राजकीय प्रवास वयाच्या २८ व्या वर्षी सुरु झाला. निलेश राणे हे माजी खासदार म्हणून कार्य करत होते आणि ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. निलेश राणे यांना जर विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांना तिसरी जागा देता येणार आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मात्र, भाजपमध्ये हे बहुदा शक्य नाही. असे चित्र दिसून येत असल्यामुळेच निलेश राणेंनी आता शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधित काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निलेश राणे यांची मुंबईमध्ये भेट झाली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाचा आणि भगव्याचा स्वीकार निलेश राणे करणार आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुडाळ आणि मालवण या मतदार संघातून ते उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

निलेश राणे यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय वर्तुळात हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निलेश राणे हे कॉम्बिनेशन जर तळकोकणात फिट बसलं तर एकनाथ शिंदे यांचा कोकणातील फायर ब्रँड युवा नेत्याच्या शोध संपू शकतो. आता येणाऱ्या निवडणुकीत बदललेले निलेश राणे हे उबाठा गटाचे वैभव नाईक यांना हॅट्रिक करू देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलेश राणे हे आपली इनिंग सुरु करताना आक्रमक पद्धतीने आपल्या पक्षाला मदत करू शकतील का ? निलेश राणे हे काहीसे बदलल्यामुळे एक आक्रमक किंवा आक्रस्ताळा आणि शीघ्रकोपी निलेश राणे जाऊन त्याऐवजी एक समंजस, मनमिळाऊ नेता म्हणून आपली ओळख करून देण्यात किती यशस्वी ठरतायेत हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version