spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sandeep Deshpande Exclusive: फायनल उमेदवाराचा निर्णय Raj Thackeray घेतील, देशपांडेंचा खुलासा

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगत आहेत. ही विधानसभा निवडणूक येईपर्यंत अनेक पैलू उलगडताना दिसत आहेत. अशातच टाईम महाराष्ट्रचे (Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची फेस टू फेस मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान संदीप देशपांडे यांनी वरळी मतदारसंघातून कोणता उमेदवार असणार याबाबत भाष्य केलं.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना मुलाखतीदरम्यान, ” मनसेचा कोणता उमेदवार हा आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदार संघातला उमेदवार असणार ? तुमचं नाव घोषित झालेलं नाही, तरी प्रचाराला सुरुवात केलीय, तुम्ही स्वयं घोषित उमेदवार आहात का ? असे विचारल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “असे आहे की, सन्माननीय राज साहेबांनी माझं नाव घोषित केलं नसलं, आणि तरी त्यांनी हे घोषित केलं की २०१९ ला आम्ही उमेदवार दिला नव्हता वरळीत, पण यावेळेला त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की, यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळीतून निवडणूक लढवेल. मनसेचा नेता म्हणून, मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून, मनेसचा कार्यकर्ता म्हणून काम करणं एखाद्या मतदार संघात आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतोय, लोकांना भेटतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका, सन्माननीय राज साहेबांची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहचवतोय. फायनल उमेदवार कोण असणार त्याचा निर्णय राज साहेब करतील आणि तो जरी मी नसेन, कोणी दुसरा असेल किंवा अन्य कोणीही असेल तरी आम्ही जी मेहनत आता करतोय ती काय वाया जाणार नाही. कारण पक्ष म्हणून ही मेहनत करतोय. त्यामुळे मेहनत करणे आमचं काम आहे. बाकी कुणी लढवायची, कुणी नाही लढवायची याचा निर्णय राज साहेब घेतील आणि योग्य वेळी घेतील.” असे मत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss