spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोनच नेते “धन्यवाद देवेंद्रजी” का करतात?

बेस्ट कामगारांच्या अनेक मागण्या मान्य झाल्यानंतर काल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) अध्यक्ष असलेल्या श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार युनियन तर्फे ” धन्यवाद देवेंद्रजी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पुर्वी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राच्या अनेक मागण्या मान्य केल्याबद्दल अभ्युदय नगर येथे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली असाच “धन्यवाद देवेंद्रजी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमांना पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थिती होते आणि पक्षाचा कार्यक्रम म्हणूनच हे कार्यक्रम होत असले तरी ही आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड हे दोन नेतेच सारखे-सारखे “धन्यवाद देवेंद्रजी” कार्यक्रम का करतात? असा प्रश्न भाजपा (BJP)च्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक भिवंडी (Bhiwandi) येथे मागच्या काळात झाली तेव्हा या बैठकीत संघटन कसे वाढवावे या विषयावर माजी आमदार कृपाशंकर सिंह यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर जेव्हा “डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांचे बलिदान” अथवा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा “एकात्म मानवता वाद” यावर जोरदार भाषण करतात तेव्हाही भाजपातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा उर भरुन येतो. त्याच कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडला आहे की, दोनच नेते सारखे-सारखे “धन्यवाद” का म्हणतात ?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्री काळात मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road), मेट्रो (Metro), अटल सेतू (Atal Setu) या सारखे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यामुळे मुंबई (Mumbai) चा चेहरामोहरा बदलला. तसेच अभ्युदय नगर सोसायटीच्या पुनर्विकास असो वा मुंबईतील रखडलेल्या एस.आर.ए. योजना असो असे अनेक प्रकल्प मार्गी लागले. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मुंबईला अधिकचेच दिले. त्यामुळे मूळ नागपूरकर असणाऱ्या मुंबईकरांवर त्यांच्यावर प्रचंड खूश होते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत 24 नगरसेवक असणाऱ्या भाजपाने तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या. त्याच जोरावर मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मुंबईकरांनी भाजपावर प्रेम दाखवले होते. पण जेव्हा अजित पवार यांना भाजपाने सोबत घेतले हे मुंबईकरांनी पाहिले, आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईरांनी “धन्यवाद देवेंद्र जी” म्हणत भाजपाला फटकारले.

भाजपात बाहेरून आलेल्यांचे “लाड” होतात आणि त्यांनाच सत्तेचा “प्रसाद” मिळतात हे पाहून मूळ भाजपाच्या कार्यकर्त्यांमधे असलेली अस्वस्थता लपून राहिलेली नाही. बाहेरुन आलेली माणसे पदे मिळवण्यात कशी “प्रविण” असतात हेही मूळ भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आता अंगवळणी पडले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीला एक विशेष महत्व आहे. भाजपाच्या संघटनेची वीण ज्याला पक्की माहिती आहे आणि वैचारिक बांधिलकी ज्यांच्याकडे आहे अशा पदाधिकाऱ्यांना अशा कोअर कमिटीमधे स्थान दिले जात होते. पण अलिकडच्या काळात कोअर कमिटी सदस्य म्हणून कुणालाही “प्रसाद” मिळतो आणि निवडणूकीत रणनीती फसते हेही आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. त्यानंतर पुन्हा तीच माणसे धन्यवाद देवेंद्र जी कार्यक्रम करतात तेव्हा दोनच माणसे सारखे धन्यवाद का म्हणतात असा प्रश्न मुळ कार्यकर्त्यांना पडतो.

पण हल्ली असे प्रश्न पडलेले भाजपाचे कार्यकर्ते मनातल्या मनात…

देणाऱ्याने देत जावे…

घेणाऱ्याने घेत जावे..

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे… !

अशी कविता गुणगुणतात आणि “धन्यवाद विंदाजी!” असे पुटपुटत राहतात, अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करत म्हणाले… परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली…

Uddhav Thackeray Birthday Banner : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जोरदार बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss