तुम्ही हरतालिका व्रत पहिल्यांदा करत असाल तर ‘या’ गोष्टी घ्या जाणुन

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत हे पाळले जाते. यावर्षी हा सण १८ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी हा सण खूप महत्त्व आहे.

तुम्ही हरतालिका व्रत पहिल्यांदा करत असाल तर ‘या’ गोष्टी घ्या जाणुन

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत हे पाळले जाते. यावर्षी हा सण १८ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी हा सण खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित स्त्रिया हे चांगला वर मिळावा म्हणून हरतालिका व्रत करतात. या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया देवी पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करतात आणि त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. या व्रतानुसार असे मानले जाते की, हे व्रत पाळल्यास वैवाहिक जीवनात कशाचीही कमी पडत नाही. पण जर तुम्ही ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत पाळत असाल तर या व्रताशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणे तुम्हाला खूप गरजेचे आहे. कारण हे व्रत करवा चौथपेक्षा ही अधिक कठीण मानले जाते.

हरतालिका व्रताच्या दिवशी तुमच्याकडून काही गोष्टी घडल्यास तुमच्या व्रताचे तुम्हाला इच्छित फळ मिळणार नाही. उलट त्या व्रताचे परिणाम ही तुम्हाला भोगावे लागू शकतात. या व्रतात चूका केल्यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनात खूप संकटांना सामोरे जावे लागते. हे व्रत करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग हरतालिका व्रताशी संबंधित नियमांबद्दल जाणुन घेऊया.

हरतालिका व्रत करत असताना टाळायच्या गोष्टी

हरतालिका व्रत करत असताना, चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये. कारण हे व्रत निर्जळ करायचे असते. तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचे नामस्मरण करण्यात तुमचा वेळ घालवावा. हरतालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी. तसेच या दिवशी अंगातील सर्व आळस टाकावा.
हरतालिका व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये. उपवास करणारी महिला किंवा तरुणी दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही. जर कोणी हरतालिका व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याने ते मध्येच सोडू नये. हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते व्रत संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे. हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. त्या दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. उपवास करत असताना लहान-मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे कोणाचे ही मन दुखू शकते. तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा त्याच्यासाठी अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी मुद्दाम किंवा नकळत कुटुंबातील कोणाशी ही वाईट वागू नका.

हरतालिका व्रत करत असताना कोणत्या गोष्टी कराव्या

हरतालिका व्रत करत असताना, साजश्रृंगार करून हरतालिका आणि शिव-पार्वतीची पूजा करावी. या दिवशी विशेषत: रात्री जागरण करावे. रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे व त्यासोबतच शिवलिंगाचे व माता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरतालिका व्रत सोडावे. हरतालिका व्रताच्या दिवशी कुटूंबासाठी सात्विक भोजन तयार करणे.

हे ही वाचा: 

प्रसिद्ध अष्टविनायकाच्या ८ गणपतीचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?

चटकदार लोणचं चवीने खाताय तर थांबा! या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version