Republic Day 2023, 26 JANUARY कसा साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन?

Republic Day 2023, 26 JANUARY कसा साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन?

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी रोजी करण्यात अली होती. त्यामुळे हा दिवस प्रजसत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे भारतात विशेष महत्व आहे. भारताच्या विविधतेचे वैशिष्ट्य या दिवशी दिसून येते. २६ जानेवारी मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो. शाळा-कॉलेज असो, सोसायटी असो सगळीकडे प्रजसत्ताक दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. नवी दिल्ली येथे मोठा उत्साह असतो या दिवशी असतो.

सर्वप्रथम सैनिकांसाठी (soldiers) बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती(Amar Jawan Jyoti), येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली(Tribute) वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य जागेवर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तसेच प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण केले जाते व २१ तोफांची सलामी दिली जाते.

या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (parade)संचलन (circulation)राजपथ मार्गावरून निघते.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ (Chitrarath)पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.

या दिवशी राष्ट्रीय सुट्टी (national holiday)दिली जाते. भारतातील ३ राष्ट्रीय सुट्यांपैकी हि एक सुट्टी आहे. सुट्टी असली तरी शाळा कॉलेजात मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून, वीर जवानांचे स्मरण करून व भारतीय ध्वजवंदन करून. राष्ट्रगीत गाऊन हा दिवस साजरा केला जातो.

हे ही वाचा:

अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांचा सिनेमा सृष्टीतील प्रवास तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

स्वतः शाहरुख खान याने मानले तरुणांचे आभार , पहा नेमकं काय झाले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version