शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दुःखातील सोबत्याची अनोखी कहाणी

हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, वटपौर्णिमा असो नागपंचमी असो किंवा आज जो मोठ्या प्रमाणत साजरा केला जाणार आहे तो सण म्हणजे बैलपोळा असो...

शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दुःखातील सोबत्याची अनोखी कहाणी

हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, वटपौर्णिमा असो नागपंचमी असो किंवा आज जो मोठ्या प्रमाणत साजरा केला जाणार आहे तो सण म्हणजे बैलपोळा असो… मराठी दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणून बैल पोळा या सणाला ओळखले जाते. शेतकऱ्याचा सर्वात प्रामाणिक मित्र म्हणजे बैल आहे. श्रावणातल्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी शेतकरी आपल्या याच जिवाभावाच्या मित्राप्रती आदर व्यक्त करतात . आज बैलपोळा म्हणजेच बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवसहा दिवस आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणातात.

परंतु या बैलपोळा सणाला नेमकी सुरवात कशी झाली असा प्रश्न हा अनेकांना पडलेला असतो. तर पुराणकाळात एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासावर सारीपाट खेळत होते. एका डावात भगवान शंकर विजयी झाले मात्र पार्वती मातेला तो डाव पटला नाही आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. तेव्हा भगवान शंकरांनी नंदीला कोण जिंकलं याबाबत विचारणा केली. नंदीनेही मग शंकर जिंकले असं सांगितलं. पार्वती मातेला त्यांच्या या उत्तराचा राग आला आणि त्यांनी मग नंदीला शाप दिला. तो शाप म्हणजे मृत्यूलोकी तुझ्या मानेवर वजन ठेवून तुझ्याकडून मेहनतीची कामं करुन घेतली जातील असा शाप त्यांनी नंदीला दिला. काही काळाने आपला राग शांत झाल्यावर पार्वतीला आपली चूक समजली आणि त्यांनी नंदीला वर्षातनं एक दिवस लोकं तुझी पूजा करतील असे सांगितलं आणि तेव्हापासून वर्षातनं एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो असं म्हणतात.

या दिवशी शेतकरी आपल्या या मित्राला नदीवर किवा ओढ्यावर घेऊन जातो. तिथे त्याला आंघोळ घातली जाते. त्याला फुलांनी सजवलं जातं. त्याची शिंगं रंगवली जातात. त्याची आरती ओवाळली जाते. मग त्याला गोडधोड खाऊ घातलं जातं आणि त्याला दिवसभर विश्रांती करु दिली जाते. यादिवशी खासकरून पुरणपोळी बनवली जाते. दिवसभर शेतकरी या बैलाला मेहनतीचं काम करु देत नाही. आपल्या शेतात राबराब राबणाऱ्या या आपल्या प्रामाणिक साथीदाराला एक दिवस आराम करु द्यायचा हीच इच्छा शेतकरी मनात बाळगतो.

खरंतर हा शेतकऱ्याचा प्रामाणिक मित्र शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात सोनं पिकवतो. त्यामुळेच शेतकरी आणि त्याचा बैल यांच्यात नेहमीच आपुलकीचं नातं पाहायला मिळतं.

हे ही वाचा :-

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही – किशोरी पेडणेकर

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version