मानवी मनोरे रचून त्यावर शिवाजी महाराज – अफजल खान भेटीचे दृश्य

दादरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयडियल गल्लीमध्ये आज मोठ्या जोशात दहीहंडी (Dahihandi ) हा सण केला जात आहे.

मानवी मनोरे रचून त्यावर शिवाजी महाराज – अफजल खान भेटीचे दृश्य

दादरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयडियल गल्लीमध्ये आज मोठ्या जोशात दहीहंडी (Dahihandi ) हा सण केला जात आहे. कोरोनानंतर ( Corona ) तब्ब्ल २ वर्षांनी सर्व सण – उत्सव हे मोठ्या जोषात साजरे केले जात आहेत. दादरमध्ये ( Dadar ) आलेल्या दहीहंडी उत्सवात मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने (Shivsagar Govinda Squad) सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गोविंदानी तीन थर उभे करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान ( Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan) यांच्या भेटीचा क्षण हा दाखवला आहे.

प्रथमतः या पथकाने मानवी मनोरे रचून थर लावले आणि त्यानंतर तीन थर रचून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा क्षण हा दाखवला आहे. शिवरायांनी अफजल खानचा कोथळा काढल्याचे दृश्य तेथे सादर केला. मालाड पूर्वेकडील शिवसागर गोविंदा पथकाने या वर्षी थरावर थर रचून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा प्रसंग सादर केला. शिवसागर गोविंदा पथकात १२० ते १५० हून अधिक मुले-मुली आहेत. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर मुंबईत धुमधडाक्यात दहीहंडी साजरी केली जात आहे. प्रत्येक गोविंदा पथकाकडून दोन वर्षांची कसर भरून काढली जात आहे. गोविंदा पथकांच्या कसरती, सादरीकरण लक्षवेधक ठरत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित केलेल्या आयडियल पर्यावरणपूरक दहीहंडीत अनेक पथकांनी सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली. दादरच्या या दहीहंडी ला सेलेब्रिटी दहीहंडी म्हणून ओळखले जाते. यामध्ये महिलांचे पथक देखील मोठ्या प्रमाणत सहभागी होते.

हे ही वाचा :- 

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहायला पसंत करता तर, हा चित्रपट आवर्जून पहा

‘पिंक वेनम’सह ब्लॅकपिंक के – पॉप ग्रुपने केले पुनरागमन

Exit mobile version