spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त…

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे वेगळे महत्व मानले जाते तसेच संकष्टी चतुर्थीलाही तितकेच महत्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात येते तर दुसरी कृष्ण पक्षात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. साधारणपणे संकष्टी चतुर्थी ही तिथी शिवपार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे. तर जाणून घेऊयात या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि पूजा विधी.

संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील ही कृष्ण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी २० सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजून १५ मिनिटांनी सुरु होऊन २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होईल. २१ सप्टेंबर रोजी चंद्रोदय रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी होणार आहे. या संकष्टी चतुर्थीला एकाच दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्यात ११ वाजून ३६ मिनिटांनी हर्ष योग सुरु होत असून संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत शिववास योग असणार आहे. या काळात गणेश आराधना करणाऱ्या गणेशभक्ताला इच्छित फळ प्राप्त होईल.

संकष्टी चतुर्थी पूजाविधी
संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावे. त्यानंतर पवित्र स्नान करून घ्यावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. तसेच घरातील आणि देवघराची साफसफाई करून स्वच्छता करून घ्यावी. घरातील मंदिरासमोर चौरंग ठेवावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढून घ्यावी. त्यानंतर चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड पसरवून घ्यावे. त्या स्वच्छ कापडावर श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी व दिवा लावून घ्यावा. पूजेला सुरुवात करावी. सर्वप्रथम गणेशाच्या कपाळावर टिळा लावावा. गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करून अक्षता, दुर्वा, फळे आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर गणपतीची आरती करून घेऊन नैवेद्य अर्पण करावा. तसेच पूजाविधी संपूर्ण झाल्यावर गोरगरिबांना दान करावे त्यामुळे गणपतीची कृपा प्राप्त होते.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss