spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवरात्रीमध्ये कोल्हापूर मधील अंबाबाई देवीचे आख्याकिका

कोल्हापूरमधील अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिराची उभारणी साधारण सहाव्या ते सातव्या शतकात झाली आहे . वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत. अंबाबाई मंदिरात सध्या नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या नवरात्र उत्सवात श्री आई अंबाबाई नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शनासाठी येत असते.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्रीमध्ये मांढरदेवीची (काळूबाई) उपासना ठरते लाभदायक

 

अंबाबाईच्या मंदिराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेद मंत्र कोरले आहेत. या देवीची मूर्ती किमतीच्या दगडांपासून बनवली गेली आहे . मूर्ती घडवताना हीरक नावाचा धातू मिसळला आहे. हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर उभे केले गेले आहे . या मूर्तीला चार हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात खालील बाजूस महाळुंग आहे आणि डाव्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती आहे.

 

या मंदिराचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असते . मंदिराच्या पश्चिमीकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. या मंदिरात साखर मिश्रित दुधाचा नैवेद्य केला जातो . रात्री देवीच्या गाभाऱ्यात आरती केली जाते. दिवसातून एकूण ५ वेळा आरती केली जाते . दररोज पहाटे ४. ३० वाजता काकड आरती केली जाते. मंगला आरतीनंतर सकाळी आठच्या सुमारास महापूजा करण्यात येते. रोज रात्री दहाच्या सुमारास शेजारती होते. यावेळी गोड दुधाचा प्रसाद असतो. गाभार्‍यात आरती करण्यात येते व यावेळी देवीला निद्रा यावी म्हणून विशेष आराधना केली जाते.

नवरात्री उत्सवात अंबाबाईच्या देवीची मिरवणूक काढली जाते . सजवलेल्या वाहनांतून नगरवासीच्या भेटीला जाते . नवरात्री उत्सवामध्ये आंबाईचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते . नवरात्री उत्सवाच्या दरम्यान देवीची आरती ९. ३० केली जाते . नवरात्रीच्या काळात मध्यरात्री अष्टमीचा होम केला जातो .

हे ही वाचा :

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा

 

Latest Posts

Don't Miss