Saturday, July 6, 2024

Latest Posts

Angarki Sankashti Chaturthi 2024: धकाधकीच्या काळात श्रद्धा असूनही बाप्पाचे पूजन करता आले नाही तर….

हिंदू पंचांगानुसार, आज (दि. २५ जून २०२४ ) अंगारक संकष्ट चतुर्थी आली आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला फार महत्व आहे. या दिवशी विधिपूर्वक गणपतीची मनोभावे पूजा करतात.

हिंदू पंचांगानुसार, आज (दि. २५ जून २०२४ ) अंगारक संकष्ट चतुर्थी आली आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला फार महत्व आहे. या दिवशी विधिपूर्वक गणपतीची मनोभावे पूजा करतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. याशिवाय मंगल ग्रहाची आणि गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकीचा उपवास केल्याने बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशीही काही भाविकांची भावना आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन मनोभावे बाप्पाची आराधना करतात. संकष्ट चतुर्थीला श्रीगणेशाच्या अनेक रुपांचे दर्शन केले जाते.

अंगारक संकष्ट चतुर्थी २५ जून रोजी पहाटे १.२३ वाजता सुरु होईल आणि रात्री ११. १० वाजता समाप्त होईल. पहाटे ते दुपारी २ वाजून ३२ मिनिटापर्यंत श्रावण नक्षत्र आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे ४ वाजून ५ मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४५ मिनिटापर्यंत असणार आहे. पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी ११ वाजून ५६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी विधिवत पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते अशी भाविकांची भावना आहे.

अंगारक संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये, असे म्हटले आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचे फुल, दुर्वांची जुडी आणि मोदक अर्पण करावे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात मनात श्रद्धा असूनही जर अंगारक संकष्ट चतुर्थीला बाप्पाचे पूजन करता नाही आले तर मनोभावे एक दुर्वा अवश्य अर्पण करावी आणि बाप्पाचे स्मरण करावे. श्रद्धेने असे केल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते असा समज असल्याचे सांगितले जाते. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर तसेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई येथील गणपती मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येते. 

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss