spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2023, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या एकत्र का जात नाहीत ?

एकादशी किंवा इतर पवित्र प्रसंगी पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. वारी करणाऱ्या व्यक्तींना वारकरी असे संबोधले जाते.पंढरीत जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करुन विठोबाचे दर्शन घेणे ही एकच इच्छा वारकऱ्याची मनात असते.

Ashadhi Wari 2023: वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर पर्यंत संपन्न होणारा एक प्रवास आहे. एक सामूहिक पदयात्रा जी पंढरपूर येथे जाऊन थांबते ती म्हणजे वारी होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळी होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा भेद नसतो. एकादशी किंवा इतर पवित्र प्रसंगी पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. वारी करणाऱ्या व्यक्तींना वारकरी असे संबोधले जाते.पंढरीत जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करुन विठोबाचे दर्शन घेणे ही एकच इच्छा वारकऱ्याची मनात असते.    

पायी केल्या जसणाऱ्या या पंढरपूरच्या वारीची सुरुवात तेराव्या शतकापासून झाली आहे. वारीत लाखोंच्या संख्येत वारकरी येतात. वारी ही एक पारंपरिक जुनी प्रथा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे देखील वारीला जायचे. वारी ही परंपरा फार जुन्या काळापासून चालू झाली असून इंग्रजांच्या काळातही हीच्यात कधीच फूट पडली नाही.फक्त हा फरक १८३२ साली पडला. तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये संघर्ष निर्माण झाला. मानपनाच्या मुद्द्यावरून वाद, हेवेदावे सुरु झाले. म्हणूनच काही लोकांनी संत ज्ञानेश्वरांची पालखी स्वतंत्रपणे काढण्याचा निर्णय घेतला.मग दोन वेगळे मार्ग सुरु झाले.संत तुकाराम महाराजांची पालखी स्वतंत्रपणे जाऊ लागली तर संत ज्ञानेश्वरांची पालखी स्वतंत्रपणे जाऊ लागली. काही लोक संत तुकारामांच्या पालखीत सहभागी झाले तर काही लोक संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत सहभागी झाले.आणि अशा प्रमाणे दोन पालेखी सोहळे सुरु झाले. आज आपण पाहतो की हा पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सोहळ्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या रथापुढे अठरा आणि मागे एकोणसत्तर दिंड्या असतात.दिंडीतील पुरुष धोतर, सदरा आणि टोपी घालून सहा, सातच्या रांगेने एकत्र पायवारी करतात. सर्व टाळ आणि मृदूंगाच्या ठोक्यावर ही मंडळी भजन आणि अभंग गात चालतात.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss