spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त ‘या’ अभंगात होऊया मंत्रमुग्ध

यंदा आषाढी एकादशी येत्या १७ जुलै बुधवारी असणार आहे. या दिवशी अनेक विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदाय पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी वारकऱ्यांच्या दिंडीसोबत नाचत-गात, टाळ-मृदूंगासोबत विठ्ठलाचे नामस्मरण करतात. वारकरी संतांनी रचलेले अभंग हे मराठी साहित्याला लाभलेला ठेवा आहे.

यंदा आषाढी एकादशी येत्या १७ जुलै बुधवारी असणार आहे. या दिवशी अनेक विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदाय पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी वारकऱ्यांच्या दिंडीसोबत नाचत-गात, टाळ-मृदूंगासोबत विठ्ठलाचे नामस्मरण करतात. वारकरी संतांनी रचलेले अभंग हे मराठी साहित्याला लाभलेला ठेवा आहे. यामध्ये भक्ती, प्रेम, समरसता आणि मानवतेचा संदेश असतो. या अभंगाची परंपरा संत ज्ञानेश्वरांनी सुरु केली. त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी लोकांपर्यंत अभंगाच्या माध्यमातून भक्ती आणि ज्ञानाचा संदेश पोहचवला. संत तुकारामांनी ५००० हून अधिक अभंग लिहिले आहेत. अभंग हा काव्यातील एक प्रकार असून यामध्ये देवाची स्तुती केली जाते. काही भाविकांना पंढरपूरला जात येत नसेल तर विठुरायाच्या या अभंगाचे नामस्मरण करा.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुळशीहार गळा कसे पितांबर
आवडे निरंतर हेचि ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

येणे सोसे मन झाले हावभरी
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बंधनापासूनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

तुका म्हणे देह भरीला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

माझे माहेर पंढरी

माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तिरी

बाप आणि आई,
माझी विठ्ठल रखुमाई
माझे माहेर पंढरी

पुंडलिक राहे बंधू
त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी

माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी

एका जनार्दनी शरण
करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी

कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा

परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकतांना ताण-भूक हरली
शाळा शिकतांना ताण-भूक हरली

गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग

नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग

पोती पाण्यात कशी तरली?
पोती पाण्यात कशी तरली?

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकतांना ताण-भूक हरली
शाळा शिकतांना ताण-भूक हरली

 

HEALTH IS WEALTH : बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे ; जाणूयात सविस्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss