Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

आषाढ महिना सुरु झाला असून राज्यभर भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सर्व भाविकांना ओढ लागली आहे ती म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची.

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

आषाढ महिना सुरु झाला असून राज्यभर भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सर्व भाविकांना ओढ लागली आहे ती म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची. विठू नामाचा गजर करत राज्यभरातून दिंड्या पंढरपूरमध्ये रवाना झाल्या आहेत. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा असून या दिवशी अनेक भाविक पंढरपूर येते विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. हरिनामाचा गजर करत, ताल व मृदूंगाच्या तालात तल्लीन होऊन वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याची देखील प्रथा सुरु झाली आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीने नगर या जिल्ह्यातील कर्जत या शहरात विसावा घेतला होता. या मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. त्याचबरोबर संत मुक्ताबाईंनी पालखीचा मुक्काम आज वाकवड येथे असणार आहे.

दरवर्षी आषाढी वारीत लाखो लोक सहभागी होऊन विठू नामाचा जयघोष करत लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात. मागील काही दिवसांपासून राज्यातून पंढरपूर येथे जाण्यासाठी अनेक दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. टाळ आणि मृदूंगाच्या तालात मग्न होऊन भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागले असते. तहान भूक विसरून त्यांना कधी एकदा पंढरपुरात पोहोचून विठुरायाचे दर्शन घेतोय असे होत असते. संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने २ जून रोजी प्रस्थान केले असून आज या वारकऱ्यांचा पायी चालत जाण्याच्या प्रवासाचा सतरावा दिवस आहे. ही पालखी महाराष्ट्राच्या अनेक खेडेगावांमधून पंढरपूरच्या दिशेने जाते. प्रत्येक गावांमध्ये पालखी थांबून पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. व अनेक भाविक या पालखीमध्ये सामील होतात आणि विठ्ठलाचे नाव घेऊन पायी प्रवास सुरु करतात. संत निवृत्तीनाथ महारांची पालखी कर्जत शहरातील विसाव्यानंतर आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. या पालखीचे आज उभे रिंगण होणार असून ग्रामस्थांकडून जेवणाची सोय करण्यात येणार आहे. आषाढी वारीत अनेक महिला वारकरी त्याचबरोबर लहान मुलांसोबत वृद्धांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सर्व भाविक आपले वय विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणत मग्न होऊन पंढरपूर येथे जातात.

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज कर्जतहुन पांढरपूर येथे रवाना झाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम कोरेगाव येथे असणार आहे. तसेच या पालखीचा दुपारचा मुक्काम हा धंदेवाडीत होणार असून या ठिकाणी माऊलींचे उभे रिंगण पार पडणार आहे. या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी भक्त दिंडीत सामील झाले आहेत. हा सोहळा अनुभवता यावा म्हणून अनेक भाविक या वारीत सामील झाले आहेत. धंदेवाडीतील रहिवासी अगदी नटूनथटून पालखीची वाट पाहत आहेत. पालखीच्या स्वागतासाठी धांदेवाडी सज्ज झाली आहे. ग्रामस्थांनी रस्त्यावर सडा सारवण करत रांगोळी काढली आहे. आज संपूर्ण गावाला पालखीची ओढ लागली आहे. त्यामुळे आज दुपारी धांडे वाडीत उभ्या रिंगणाचा मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश

Ashadhi Ekadashi 2023, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या एकत्र का जात नाहीत ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version