spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

संपूर्ण महाराष्ट्राला आता आषाढी एकादशीची ओढ लागली आहे. सर्वत्र भक्तिमय प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. माउली माउली म्हणत आता प्रत्येकजण विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर्ले आहेत. सर्व वारकरी भक्तांमध्ये आता मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला आता आषाढी एकादशीची ओढ लागली आहे. सर्वत्र भक्तिमय प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. माउली माउली म्हणत आता प्रत्येकजण विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर्ले आहेत. सर्व वारकरी भक्तांमध्ये आता मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. राज्यातून अनेक पालख्यांचे प्रस्थान झाले असून अनेक पालख्या या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. टाळ आणि मृदूंगाच्या तेलामध्ये तल्लीन होऊन विठूरायाचा गजर करत आषाढी वारी आता पुढे चालत आहे. प्राचीन काळापासून पालखी सोहळ्याची परंपरा महाराष्ट्राला लाभली. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मुक्कामाला होती. आज निवृत्तीनाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. तसेच संत मुक्ताबाईंची पालखी वाकवड येथील मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. तसेच संत मुक्ताबाईंची पालखी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम या शहरात विसावा घेणार आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत मुक्ताबाई यांची पालखी २ जून रोजी रवाना झाली असून लाखो भाविक या पालखी मध्ये सहभागी झाले आहेत. आज या दोन्ही पालख्यांचा विसावा दिवस आहे. मागील वीस दिवसांपासून लाखो वारकरी भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. विठुरायाचे नाव घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. तसेच राज्यातून प्रस्थान झालेल्या पालख्याना पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. विठूनामाचा गजरात संपूर्ण पंढरीची वारी वाहून गेली आहे. भजनात व अभंगात तल्लीन होऊन नाचत गात वारकरी भक्त पंढरपूरच्या दिशेने पुढे जात आहेत. आपले वय विसरून अनेकजण या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. पंढरीची वारी अनेक खेडेगावांमधून मार्गस्थ होते. प्रत्येक गावात या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. अनेक गावांमधून भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. संत निवृत्तीनाथांची पालखी कोरेगाव येथील मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. त्याचबरोबर संत मुक्ताबाईंची पालखी देखील वाकवाड येथील मुक्कामानंतर पंढरपुरच्या दिशेने पुढे निघाली आहे.

आषाढी वारीत वृद्धांसह महिलांची देखील लक्षणीय संख्या दिसून येत आहेत. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले असून या वातावरणातून दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहे. विठू नामाचा गाजर करत, अभंगात तल्लीन होऊन भाविक तहान भूक विसरून विठ्ठलाच्या दारी पोहचण्याची वाट पाहत आहेत. आज संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखीचा विसावा दिवस आहे. संत निवृत्तीनाथ यांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी कोरेगावहून वीस किलोमीटरवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातीलरावगावला मुक्कामाला पोहचणार असून आतापर्यंत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पायी चालत २९९ किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तसेच संत मुक्ताबाई यांच्या पालखीने आतापर्यंत पायी चालत तब्बल ३४८ किलोमीटरचा प्रवास केला आहे. संत मुक्ताबाईंनी पालखी आज भूम या शहरात विसावा घेणार आहे.

हे ही वाचा:

पुण्यामधील घर पाण्याच्या टँकरवर अवलंबून

तेजस्विनीने दिले पहिल्यांदीच स्पष्टीकरण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss