बहिण-भावाचं अतूट नाते दर्शवणारा सण ‘भाऊबीज’,

बहिण-भावाचं अतूट नाते दर्शवणारा सण ‘भाऊबीज’,

आज भाऊबीज म्हणजे २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. दिवाळीतील गोड नात म्हणजे “भाऊबीज”,(Bhaubeej). या सणाला दिवाळीत खूप महत्व असते. या सणाला हिंदीत भाईदूज (Bhai Dooj) असे म्हणतात.  भाऊ – बहिणीतला स्नेहाचं प्रतिक असलेला सण म्हणजे भाऊबीज. वसुबारसपासून सुरु होणार दिवाळी सण भाऊबीज पर्यंत असतो. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो आणि बहिण त्याला ओवाळते आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या सणामुळे भाऊ-बहिणीच नात अजून घट्ट होत. असा हा भाऊबीज सण. जाणून घेऊया या मागची परंपरा.

भाऊबीजचा (Bhaubeej) दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. भाऊ – बहिणचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस मानला जातो.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या मागे एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

* भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.
– श्री रवींद्र भगवान पाठक गुरुजी , ठाणे.

Exit mobile version