Eid-e-Milad निमित्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवशी असणार ईदची सुट्टी

Eid-e-Milad निमित्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवशी असणार ईदची सुट्टी

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर (Mumbai City), मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात असल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

यावर्षी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणारी ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी हे सण एका मागोमाग आले आहेत. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात येत असते तर अनंत चतुर्दशी या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली होती. यामध्ये सरकारने ईदची सुट्टी 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी जाहीर करावी, जेणेकरून मिरवणुका काढता येतील अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, मुंबई आणि मुंबई उपनगरात 18 सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार आता मुस्लिम बांधव ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात येणारा जुलूस 18 सप्टेंबरला काढू शकणार आहेत.

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version