spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas 2022 : ख्रिसमस हा २५ डिसेंबरला का साजरा केला जातो ?

Christmas 2022 : संपूर्ण देशात ख्रिसमस (Christmas 2022) हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण इतर देशात वेगवेगळया नावाने ओळखला जातो. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. ख्रिसमस हा मोजक्या सणांपैकी एक आहे जो दरवर्षी त्याच तारखेला साजरा केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून २५ डिसेंबरला ख्रिसमस (Christmas 2022) हा सण का साजरा केला जातो या बद्दल सांगणार आहोत.

ख्रिसमसचा इतिहास काही शतकांपासून जुना आहे. ख्रिसमस हा सण पहिल्यांदा रोम या देशात साजरा केला गेला होता असे म्हणण्यात आले. पण २५ डिसेंबर हा दिवस रोममध्ये सूर्यदेवाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जात असे. त्यावेळी रोम या देशातील प्रजेचा राजा सूर्यदेवाला आपले देव मानत असत आणि सूर्य देवाची पूजा देखील करत असत.

 

पण इसवी सन ३३० पर्यंत रोममध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार जास्त प्रमाणात होऊ लागला. रोम या देशामध्ये कॅथलिक लोकांच्या धर्माच्या संख्या जास्त वाढू लागली त्यानंतर इसवी सन ३३६ मध्ये ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी येशू ख्रिस्ताला सूर्यदेवाचा अवतार म्हणून स्वीकारले होते आणि तेव्हापासून २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण सुरु करण्याची प्रथा चालू झाली.

काही लोक वाईटावर चांगल्याच विजय झाला म्हणून हा दिवस साजरा करतात. कॅथलिक लोकांसाठी ख्रिसमस हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून करतात. पण काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते.नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss