Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

मुंबई म्हंटल की सर्व सण उत्सव यांचे माहेरघर आहे. येथे प्रत्येक जातीतील, पंथातील सण खूप उत्साहात, आनंदात साजरे केले जातात. त्यात दहीकाला किंवा दहीहंडी सारखा उत्सव म्हणजे सोन्याहून पिवळे क्षण असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे आणि मुंबईला ओळखले जाते. दहीकाला म्हणजे आबालवृद्धांच्या आवडीचा असा हा सण. हा केवळ सण नव्हे तर एक मोठा उत्सव असतो. हा उत्सव प्रत्येक जण तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दहीकालेसाठी सर्वजण आज उत्सुक तर असतीलच. गेल्या काही वर्षात याच उत्सवाला आता स्पर्धेचं रूप देण्यात आलं आहे. ज्यामुळे हा उत्सव उत्सव कमी आणि स्पर्धा अधिक वाटायला लागला आहे. काही ठिकाणी तर या खेळाला किंवा उत्सवाला राजकीय सोहळा बनवण्यात आले आहे. याच दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. आता पाहुयात नवीमुंबईतील  गोपाळकालेची पूर्वसंध्या नक्की काय दाखवणार आहे गोपाळांच्या आणि गोपाळकालेच्या किमया. 

छत्रपती संभाजीराजे फोडणार नवी मुंबईतून ‘महाराष्ट्राच्या परिवर्तनाची’ प्रतिकात्मक दहीहंडी…आयोजन स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत उपस्थित असतील.

गौतमी पाटील संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत असेल.

सई ताम्हणकर – संध्याकाळी ७ वाजता येईल.

  1. बाबू गेनू दहीहंडी मंडळ
  2. दगडूशेठ दहीहंडी मंडळ
  3. कोथरूड महिला दहीहंडी मंडळ.
  4. पुनीत बालन दहीहंडी मंडळ. (अमित बालन यांच्या पुढाकाराने 27 दहीहंडी मंडळ एकत्र येऊन एकच दहीहंडी साजरी करणार आहे.
  5. अमोल बालवडकर दहीहंडी मंडळ. ( ऑलम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे आणि अभिनेत्री दिशा पटानी उपस्थित राहणार आहेत)
  6. खजिना वीर दहीहंडी मंडळ.
  7. गुरुजी तालीम दहीहंडी मंडळ.

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

Dahihandi 2024 special : ठाण्यातील हंडयां पाहायच्यात आहेत ? ; मग या.. पाहुयात ही बक्षिसांची लयलूट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version