Dasara 2022 : द्या दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा !

सध्या नवरात्र सुरू असून लवकरच विजयादशमी साजरी केली जाईल. विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Dasara 2022 : द्या दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा !

Happy Dussehra 2022 : सध्या नवरात्र सुरू असून लवकरच विजयादशमी साजरी केली जाईल. विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही सणाच्या मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह द्विगुणित केला जातो.

पूर्वी सगळे पाहुणे मंडळी एकत्र येऊन सण साजरे करायचे. लहान मुले, भरलेले घर, आंगणातील रांगोळी, गोडधोड जेवण, याची रेलचेल असायची. पण, आता कोणालाही वेळ नसतो. आपण कामाचा व्याप इतका मागे लावून घेतला आहे की, एकमेकांना शुभेच्छा द्यायला पण आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे सण आणि शुभेच्छा व्हर्च्युअल झाल्या आहेत. सरा शुभेच्छा संदेश, दसरा शुभेच्छा स्टेटस, घेऊन आलो आहोत.जे तुम्ही आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या दसरा शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक वर पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी काही खास संदेश पाहूयात.

 

हे ही वाचा:

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

IND vs SA : केएल राहुल, विराटला अंतिम सामन्यासाठी दिली विश्रांती, तर आजच्या सामन्यात शाहबाजचे पदार्पण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version