Datta Jayanti 2022 दत्त जयंती माहिती

Datta Jayanti 2022 दत्त जयंती माहिती

दत्त जयंती हा सण उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी दत्त जयंती ही मार्गशीष महिन्यात साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती ही ७ डिसेंबर २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. भगवान दत्त हे तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांची शक्ती दत्त भगवान मध्ये समावेश केली गेली आहे. दत्त भगवानला तीन चेहरे आणि सहा हात असतात. दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दत्त जयंती बद्दल सांगणार आहोत.

दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म असा होतो. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा आहे. श्री दत्त भगवांच्या वेगवेगळया कथा प्रचलित आहे. मात्र सर्व कथांमध्ये दत्तात्रय श्री विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते. अत्रीऋषीने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती.

 

त्याच्या तपश्चर्याने सारे त्रीभूण पळून गेले होते. अत्रीऋषींच्या तपस्या करून ब्रह्मा विष्णु महेश हे तिन्ही देव प्रकट केली होते. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपश्चर्याचे कारणे विचारले होते. अत्रीऋषींनी देवतांना विनंती केली की माझा पुत्ररूपाने जन्म घ्यावा. देवांनी त्यांची विनंती मान्य केली. ब्रह्मा विष्णु महेश या देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय सोम दुर्वास असे तीन पुत्र आणि एक शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीना प्राप्त झाली.

विष्णूचे एकूण २४ अवतार आहेत, या २४ अवतारांमधील सहावा अवतार भगवान दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

paneer benefits तुम्हाला पनीर खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

paneer benefits तुम्हाला पनीर खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version