Diwali 2022 : दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन

दिवाळी हा सण रोषणाईचा उत्सव आहे. दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद आज पूर्वा फॉउंडेशनमधील दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला आहे.

Diwali 2022 : दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन

दिवाळी हा सण रोषणाईचा उत्सव आहे. दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद आज पूर्वा फॉउंडेशनमधील दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला आहे.

२०१३ या सालापासून पूर्वा फॉउंडेशन हि संस्था दिव्यांग मुलासाठी काम करत आहे. हि संस्था मुलुंड येथील वामनराव माध्यमिक या शाळेत दिव्यांग मुलांचे वर्ग घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेमध्ये वय वर्ष ३ पासून ३० वर्षापर्यंतचे विध्यार्थी येतात. सध्या एकूण ३२ मुलं पूर्वा फॉउंडेशन मार्फत प्रशिक्षण घेत आहे.

सध्या सर्वांना दिवाळीचे वेध हे लागले आहेत. आणि तब्ब्ल २ वर्षानंतर दिवाळी हा सण मोठ्या उत्सहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. बाजारात अनेकांनी खरेदी सुद्धा चालू केली आहे. याचेच औचित्य साधून पूर्वा फॉउंडेशनचे संचालक बाबुराव शिरतुरे यांनी त्यांच्याकडे शिकत असलेल्या दिव्यांग मुलांसाठी आज दि १५ ऑक्टोबर २०२२ रोजी मुलुंड पूर्व , वामनराव हायस्कूल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र आज आयोजित केले होते. आज या प्रदर्शनामध्ये हि सर्व दिव्यांग मुल स्वतः उपस्थित तर होतेच पण त्याच सोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. प्रदर्शनामधील सर्व वस्तू मुलांनी स्वतः केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता.

बाबुराव शिरतुरे हे पूर्वा फॉउंडेशनचे संचालक आहेत. बाबुराव शिरतुरे त्यांनी सांगितले कि, ते स्वतः याआधी एक शिपाई कामगार म्हणून होते. त्यांना उच्च शिक्षण घेऊन शिक्षक व्हायचे होते. परंतु इतर शिक्षकासारखे त्यांना शिकायचे न्हवते किंबहुना शिकवायचे देखील न्हवते. म्हणून त्यांनी दिव्यांग मुलांना शिकवता येतील असे शिक्षण घेऊन २०१३ साली पूर्वा फॉउंडेशन हि संस्था दिव्यांग मुलासाठी चालू केली. आज माझ्याकडे ३२ मुलं शिकत आहेत आणि अधून मधून सणाच्या दिवशी आम्ही आमच्या मुलांकडून असे नवं नवीन उपक्रम करून घेतो त्यामुळे त्यांना देखील शिकण्यास मिळते. गेल्या ६ वर्षांपासून मुलुंडमध्ये आम्ही हे वर्ग घेत आहोत. असे बाबुराव शिरतुरे यांनी सांगितले.

तसेच यावेळी काही मुलं आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला त्यावेळी प्रत्येक पालकांनी त्यांचे अनुभव देखील सांगितले आणि आपलं मुलं हे नव नवीन गोष्टी शिकत आहे याचा आनंद देखील पालकांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

सिद्धेश डोईफोडे आणि विद्या डोईफोडे –

गेल्या २-३ महिन्यापासूनच मी स्वतः इथे  कामाला लागली आहे. आणि माझं पाल्याचा देखील मी इथे ऍडमिशन घेतले आहे. माझ्या मुलाला तर इथे नाव नवीन गोष्टी शिकायला मिळतच आहे पण एक शिक्षक म्हणून मला देखील खूप काही शिकण्यास मिळत आहे. एक नवीन अनुभव मिळत आहे. जास्तीत जास्त गोष्टी आम्ही मुलांकडून करून घेतो आणि मुलं देखील आम्हाला चांगला रिस्पॉन्स देतात असे पूर्वा फॉउंडेशनच्या शिक्षिका आणि सिद्धेशच्या आई विद्या डोईफोडे यांनी सांगितले.

शुभम शेट्टी आणि ज्योती शेट्टी – 

मी स्वतः हे सर्व केलं मला खूप आनंद झाला असं म्हणत शुभम शेट्टी या विद्यार्थ्याने आनंद व्यक्त केला आहे तर सर्व मुलांनी मिळून या सर्व वस्तू बनवल्या आहेत. प्रत्येकाचा यामध्ये सहभाग आहे. माझा मुलगा शुभम हा गेल्या ४ वर्षांपासून या शाळेत शिकत आहे आणि नवनवीन गोष्टी शिकत आहे असे शुभमच्या आई ज्योती शेट्टी यांनी सांगितले आहे.

प्रांजल – 

प्रांजल या विद्यार्थिनीने सांगितले की, तिने हाताने लिफाफा (अेन्व्हलउप्ब) बनवले आहेत. तसेच प्रत्येक लिफाफ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम देखील दिसून आले आहे.

शुभम भगत आणि प्रतीक्षा भगत – 

माझा मुलगा शुभम भगत हा गेल्या ४-५ वर्षांपासून इथे शिकत आहे. येथील सर्व शिक्षक सर्व मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीस शिकवतात आणि मुलांकडून करून घेतात त्यामुळे आमची मुलं देखील नवीन गोष्टी शिकतात असे शुभमच्या आई प्रतीक्षा भगत यांनी सांगितले आहे.

सीमा पांडे – 

माझी दोन मुलं इथे शिकत आहेत. मोठा मुलगा ४ वर्षांपासून शिकत आहेत तर दुसरा मुलगा १ वर्षांपासून इथे शिकत आहे. इथे मुलांना चांगल्या सवयी तर लावल्या जातातच पण त्याबरोबर नवनवीन उपक्रम घेऊन त्यांना नवीन गोष्टी देखील शिकवल्या जातात असे सीमा पांडे यांनी सांगितले.

आज मुलुंड पूर्व ला दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र आज आयोजित केले. यावेळी अनेकांनी प्रतिसाद हा दर्शवला होता आणि त्याच सोबत मुलांसोबत मुलांच्या पालकांनी देखील तितकाच सहभाग हा दर्शवला होता.

हे ही वाचा :

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version