Diwali 2022 : दिवाळीत मिठाई विकत घेणार आहात का ? तर ‘या’ गोष्टीची काळजी नक्की घ्या

Diwali 2022 : दिवाळीत मिठाई विकत घेणार आहात का ? तर ‘या’ गोष्टीची काळजी नक्की घ्या

दिवाळी हा सण आनंदाचा आहे. यावेळी दिवाळी 21ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आता दिवाळी म्हटले की मिठाई तर आलीच. दिवाळी मिठाई शिवाय अपूर्ण आहे. सध्या मिठाईच्या मार्केटमध्ये भरपुर दुकान बघायला मिळतात. पण दिवाळीत मिठाई विकत घेतांना विचार करा. कारण आता पदार्थामध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. भेसळयुक्त पदार्थ खाल्याने तुम्ही वेगवेगळया आजारांना बळी पडू शकता. तर चला तर जाणून घेऊया दिवाळीत मिठाई विकत घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत आकर्षित करणाऱ्या चॉकलेट फटक्यांपासून दूर रहा

 

तुम्ही जर मार्केटमधून मिठाई विकत घेत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगीबिरंगी मिठाई दिसेल. मग या मिठाई पासून तुम्ही दूर राहा. कारण या रंगीबिरंगी मिठाई मध्ये भेसळयुक्त रंग मिक्स केलेले असतात. आणि जर तुम्ही ती मिठाई विकत घेतली तर तुम्हाला एलर्जी होऊ शकते. किंवा किडणीचे आजार देखील तुम्हाला होऊ शकतात. म्हणून दिवाळीत मिठाई घेतांना काळजी घेणे.

बाजारात अनेक वेळा आपल्याला मिठाई वर चांदीचे वर्क पाहायला मिळतात. आणि मिठाई वर वर्क असल्यामुळे मिठाई खूप सुंदर दिसते. पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण आजकाल भेसळयुक्त प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. तसेच वर्क ऐवजी मिठाई वर ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही मिठाई विकत घेताना नीट पारखून मिठाई विकत घ्या.

 

सणासुदीमध्ये मिठाई बनवताना जास्त करून भेसळयुक्त मावा खूप वापरला जातो. आणि ते आपल्या आरोग्यास हानिकारक असू शकते. कारण माव्यामध्ये भेसळदुधाची पावडर मिक्स केली जाते. त्यामुळे मिठाई विकत घेताना विश्वासू दुकानदार काढूनच घ्यावी.

मिठाईवर बुरशी असल्यास मिठाई विकत घेऊ नये. बुरशी असल्यास मिठाईचा रंग थोडा वेगळा दिसतो.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

 

Exit mobile version