Diwali 2022 : दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत आहात ? तर ‘या ठिकाणी नक्की भेट द्या

Diwali 2022 :  दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत आहात ? तर ‘या  ठिकाणी नक्की भेट द्या

दिवाळीची सुट्टी ही तुमच्यासाठी खूप खास असते. काही लोक सुट्यांमध्ये शनिवार, रविवार यांचा विचार करतात. तसेच दिवाळीची सुट्टी ही पाच ते सहा दिवसाची असते यामुळे दिवाळीच्या सुटीत लोक टूरवर जाण्याचा विचार करतात. दिवाळीची सुट्टी म्हणजे आनंदाची आणि उत्साहाची असते. तुम्ही जर दिवाळीच्या सुट्टीत बाहेर जाण्याचा विचार करताय तर ही बातमी नक्की वाचा. जिथे तुम्ही दिवाळीचा आनंद घेऊ शकता आणि सुट्टी साजरी करू शकता.

हे ही वाचा : भारतात पर्यटनासाठी ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या

 

अयोध्या –

जर तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत बाहेर जाण्याचा विचार करताय तर तुम्ही अयोध्या या ठिकाणी नक्की भेट द्या. अयोध्या म्हणजे प्रभू श्री रामाचे जन्मस्थान होय. कथानुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्री राम अयोध्येत परतले होते. रावणाचे वध करून अयोध्या मध्ये परतले होते. त्यामुळे अयोध्यामध्ये दिवाळी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर तुम्ही दिवाळीत अयोध्या या ठिकाणी भेट देऊ शकता.

अमृतसर –

अमृतसर हे सुवर्ण मंदिरासाठी ओळखले जाते. अमृतसरमध्ये दिवाळी वेगळया प्रकारे साजरी केली जाते. जर तुम्ही दिवाळीत अमृतसर जाण्याचा विचार करताय तर तुम्ही नक्की जा कारण अमृतसर मध्ये फटाके उडवण्याची एक वेगळीच मजा पाहायला मिळते. आणि तुम्ही इथे होणाऱ्या फटाक्यांची मजा घेऊ शकता.

 

राजस्थान –

राजस्थानमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. राजस्थानमध्ये दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशी पासून सुरुवात आणि तिथे छोटी दिवाळी बडी दिवाळी असे देखील साजरी करतात. राजस्थानमध्ये दिवाळीत असंख्य दिवे लावले जाते. संपूर्ण घरात पणत्या लावून विजेच्या दिव्यांनी चमकतात. तसेच राजस्थानमध्ये दिवाळीत मिठाईमध्ये सोनपापडी, जलेबी, फेणी, तिल के लड्डू , मावा कचोरी, हे देखील पदार्थ प्रसिद्द आहे. त्यासाठी तुम्ही राजस्थान या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.

वाराणसी –

वाराणसीमध्ये होणाऱ्या गंगा आरती झाल्यानंतर नद्यांमध्ये दिवे , मेणबत्या सोडल्या जातात. ते दृश्य बगण्यासारखे असते. आणि तसेच दिवाळीत रात्रभर फटक्यांनचा आनंद लुटा येतो. जर तुम्हाला देखील फटाक्यांचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही नक्की वाराणसी या ठिकाणी भेट द्या.

जयपुर –

जयपूरची दिवाळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांची बाजी आणि रोषणाईच्या बाजारपेठा. जर तुम्ही जयपूरमध्ये दिवाळीनिमित्त भेट देण्याचा विचार करत आहात तर तुम्ही जलमहाल या ठिकाणी भेट द्या. दिवाळीच्या दिवसात जयपूर भरपूर प्रमाणात सजवले जाते. आणि सर्वंनाचे लक्ष वेधून टाकते. दिवाळीच्या वेळी या ठिकाणचा प्रत्येक कोपरा परी दिव्यांनी उजळून निघतो. तसेच तुम्ही जोहरी बाजार या ठिकाणी देखील भेट देऊ शकता. जयपूरमधील जोहरीबाजार हा दागिन्यांसाठी भरपूर प्रसिद्द आहे. जर तुम्हाला दागिन्यांची खरेदी करायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी तिखट शंकरपाळी

 

Exit mobile version