Diwali 2022 : बहिण-भावाचं अतूट नाते दर्शवणारा सण ‘भाऊबीज’, जाणून घ्या पौराणिक कथा

Diwali 2022 :  बहिण-भावाचं अतूट नाते दर्शवणारा सण ‘भाऊबीज’, जाणून घ्या पौराणिक कथा

दिवाळीतील गोड नात म्हणजे “भाऊबीज”,(Bhaubeej). या सणाला दिवाळीत खूप महत्व असते. या सणाला हिंदीत भाईदूज (Bhai Dooj) असे म्हणतात. यावेळी भाऊबीज हा सण २६ ऑक्टोबर रोजी आहे. भाऊ – बहिणीतला स्नेहाचं प्रतिक असलेला सण म्हणजे भाऊबीज. वसुबारसपासून सुरु होणार दिवाळी सण भाऊबीज पर्यंत असतो. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो आणि बहिण त्याला ओवाळते आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या सणामुळे भाऊ-बहिणीच नात अजून घट्ट होत. असा हा भाऊबीज सण. जाणून घेऊया या मागची परंपरा.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

 

भाऊबीजचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. भाऊ – बहिणचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस मानला जातो.

 

भाऊबीज ची कथा –

भाऊबीजच्या दिवशी यमुना आपल्याला भावला म्हणजेच यमाला घरी भोजनाला बोलावते. पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेचे बोलणे टाळतो. कातिर्क द्वितीया दिवशी यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदी होते. यमुना आनंदी होऊन यमराचे स्वागत करते त्याला ओवाळते. आणि प्रसन्न होऊन भोजन वाढते. यावर यमराज प्रसन्न होऊन बहिणीला वरदान मागायला सांगतो. तेव्हा यमुना यमराजला म्हणते की तू असाच दरवर्षी घरी ये आणि प्रसन्न होऊन भोजन करून जा. अशी प्रथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात ?

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या मागे एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीतील नरकचतुर्थी सणाची कथा, जाणून घ्या प्रथा

 

Exit mobile version