spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळी स्पेशल, घरच्या घरी बनवा ओल्या नारळाच्या करंज्या

दिवाळी म्हटले तर डोळ्यांसमोर कंदील, रोषणाई, आनंद, दिवाळी शुभेच्छा , दिवाळी फराळ येतातच. दिवाळी म्हटलं कि १५ दिवस आधीच फराळाची सुरूवात होते. प्रत्येक घरात फराळ तयार करण्याची लगबग चालू असते बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचे प्रमाण चुकले की पदार्थ बिघडतो. दिवाळीच्या फराळामधला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या, सुके खोबरे, मैदा आणि पिठी साखरेच्या सुक्या करंज्या आपण नेहमीच दिवाळीच्या फराळाला खातो. पण मैदा हा आरोग्यासाठी तितका चांगला नाही. त्यामुळे तुम्ही ओल्या नारळाच्या रेसिपीज करंज्यादेखील दिवाळीला करू शकता.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी बेसनाचे लाडू…

 

ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्याचे साहित्य –

ओले खोबरे (एक नारळ)

चिरलेला गूळ

वेलची पावडर

काजू

बदाम

बेदाणे

तूप

गव्हाचे पीठ

मीठ

पाणी

 

ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्याची कृती –

 

सर्व प्रथम चांगले कणीक मळून घ्या आणि ओल्या कपड्यात बांधून ठेवा.

त्यानंतर एका भांड्यात ओले खोबरे आणि गूळ एकत्र करून चांगले भाजून घ्या. मिश्रण चांगले भाजून झाले की त्यामध्ये वेलची पावडर, काजू, बदाम ,बेदाणे घालणे आणि हे मिश्रण थंड होऊन देणे.

मळलेल्या कणिक पासून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणे. आणि पुऱ्याच्या आकारात लाटून घेणे. लाटून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले सारण घालून घेणे आणि बाजूने करंजी सारखा आकार देणे. आणि तेल चांगले गरम करून घेणे. मंद आचेवर तेलामध्ये करंज्या तळून घेणे. आणि दिवाळी साठी घुसाघुशीत करंज्या खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

 

Latest Posts

Don't Miss