Diwali 2022 : फटाकेपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Diwali 2022 : फटाकेपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

नवरात्री संपल्यावर सर्वांना दिवाळी या सणाचे वेध लागते. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हंटले की फटाके , कंदील , गोडाचे पदार्थ , रोषणाई आले. दिवाळी हा सण प्रत्येकांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. दिवाळी म्हटले की सर्वांच्या घरात एक वेगळेच वातावरण असते. तसेच दिवाळी फटाक्यांशिवाय अपूर्ण आहे . दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जाते. या फटाक्याच्या प्रदूषणामुळे लोकांना खूप त्रास होतो. तसेच प्रदूषणामुळे डोळ्यात जळजळ, चेहरा लाल होणे, खोकला अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या प्रदूषणामुळे लहान मुलांसोबत वृद्धांना देखील त्रास होतो. तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळी का साजरी केली जाते ? घ्या जाणून

 

प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती उपाय –

नाकाला तूप किंवा तेल लावल्याने त्याचे अनेक फायदे होतात. त्यामुळे दूषित हवेचा प्रभाव रोखण्यास मदत होते. तुपाचा एक थेंब सकाळ संध्याकाळ नाकात टाका. यामुळे दूषित पदार्थ फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करा. गुळाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला उष्णता मिळते. गुळ खाल्याने फुफ्फुसे स्वच्छ होतात. गुळामध्ये लोह असते जे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा चांगला राखण्यास मदत करते.

 

दिवाळीमध्ये फटाक्याच्या प्रदूषणा पासून दूर राहण्यासाठी तुम्ही त्रिफळाचा देखील वापर करू शकता. कोमट गरम पाण्यात मध मिक्सकरून देखील पिऊ शकता. तसेच त्रिफळाच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

दिवाळीच्या दिवशी हवामानात बदल होऊ लागतो . थंडी सुरू होते, आणि या ऋतूत आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. बदलत्या ऋतूमध्ये आल्याचे सेवन करणे. यामुळे प्रदूषण आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो.

जर तुम्हाला प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होत असेल तर दररोज वाफ घ्या. यामुळे तुमचे नाक आणि श्वासनलिका उघडेल आणि तुम्हाला त्रास देखील कमी होईल.

हे ही वाचा :

Gambia Cough Syrup Death : कफ सिरप बद्दल पालकांच्या मनात संभ्रम, जाणून घ्या सिरप मुलाच्या शरीरावर कसं परिणाम करतं?

 

Exit mobile version