spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळी सणात ‘या’ गोष्टी घरात आवर्जून करा

दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. आणि तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो. दिवाळी हा दिव्यांचा, एकतेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचे त्यांच्या अयोध्येच्या राज्यात घरी परतले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. जेव्हा भगवान रामाने राक्षस रावणाचा वध केला होता. यावर असे म्हटले जाते की वाईटावर चांगल्याच विजय झाला असे संभोधले जाते. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळीत कोणत्या मजेशीर गोष्टी करायच्या हे सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : यंदा दिवाळी मध्ये धमाकेदार ऑफर, घ्या स्वस्तात कार

 

दिवाळी ही घरात रोषणाई घेऊन येते. आता सर्वी कडेच दिवाळीची लगबग दिसत आहे. दिवाळी हा सण अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर तुम्ही दिवाळीत अशा काही गोष्टी करू शकता, ज्यामुळे घरात काही मजेशीर गोष्टी देखील होतील. दिवाळी हा सण आनंदाचा असतो. दिवाळीची साफसफाई ही या सणांची अत्यावश्यक बाब आहे. दिवाळी मध्ये दिवाळी पहाट या सणाला खूप महत्व आहे.

दिवाळीच्या दिवसात घरात पारंपरिक पद्धतीने आकाश कंदील बनवा. आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार द्या. आणि अंगणात लावा.

दिवाळी मध्ये तुम्ही मातीचे दिवे आणून त्यावर सुंदर पद्धतीने नक्षीकाम देखील करू शकता. त्यावर वर्क देखील करू शकता.

 

दिवाळी म्हटले की मिठाई आणि फराळ आलेच. तर तुम्ही दिवाळी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फराळ किंवा तुम्हाला जी आवडेल ती मिठाई देखील बनवू शकता. तुम्ही मिठाई मध्ये चॉकलेट मिठाई, ड्रायफ्रूट मिठाई , काजुकतरी,अशा प्रकारे देखील मिठाई तुम्ही बनवू शकता. स्वतःच्या हाताने मिठाई बनवल्याने मिठाईला एक वेगळीच चव येते.

अंगणात तुम्ही मोठ्या प्रमाणात रांगोळी देखील काढू शकता. रांगोळी मध्ये तुम्ही कार्टून , किंवा वेगळ्या पद्धतीचे चित्रे , ठसे , फुल आणि फुटप्रिंट सारख्या डिझाइन्स देखील तुम्ही काढू शकता.

दिवाळीमध्ये घराचे दार देखील सजवू शकता. झेंडूच्या चमकदार फुलांचा वापर करून तुम्ही दिवाळी सजावट करू शकता. तसेच झेंडूच्या हारांना सौभाग्याचे लक्षण मानले जाते. झेंडूची फुले भिंतींना एक आकर्षक स्वरूप देण्यासाठी भिंतीची सजावट म्हणून वापर करू शकता.

दिवाळी मध्ये तुम्ही गरजू लोकांना दानधर्म देखील करू शकता. अनाथ आश्रमला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत आहात ? तर ‘या ठिकाणी नक्की भेट द्या

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss