Diwali 2022 : धनत्रयोदशीला करू नका ‘या’ वस्तूंची खरेदी

Diwali 2022 : धनत्रयोदशीला करू नका ‘या’ वस्तूंची खरेदी

दिवाळीमध्ये धनत्रयोदशी ही दुसऱ्या दिवशी असते. दिवाळीला अनेक जण नवीन कपडे खरेदी करतात. दिवाळीमध्ये अंगणात रांगोळी काढतात आणि दिवे लावून रोषणाई करतात. त्यामुळे मन प्रसन्न होते. दिवाळीसाठी आता काही दिवसच बाकी आहे. धनत्रयोदशी धनाची म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवशी धनत्रयोदशी २२ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. तसेच या दिवशी काही वस्तू आहेत त्या खरेदी नाही केल्या पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

 

धनत्रयोदशी दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी केली जात नाही. त्यामुळे कुबेर प्रसन्न होत नाही. तसेच लोह हा शनिदेवाचा कारक मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी केल्यास अशुभ मानले जाते.

धनत्रयोदशीला चाकू, कात्री, पिन, सुया या वस्तू खरेदी करणे टाळावे. धनत्रयोदशीच्या दिवशी धार असणाऱ्या या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

 

धनत्रयोदशीला तेल, तूप खरेदी करत असाल तर सावधान. कारण अशा वस्तूमध्ये भेसळ होऊ शकते. आणि या दिवशी अशुद्ध वस्तू खरेदी करणे टाळा.

काही लोक काचेची भांडी खरेदी करतात. काचेचा संबंध राहुशी मानला जातो. काचेच्या वस्तू खरेदी केल्यास घरात काहीतरी अशुभ घडते असे बोले जाते. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या वस्तू खरेदी करू नये.

प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करू नका. कारण प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यास घरात सुख -समृद्धी राहत नाही. म्हणून प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणे टाळा.

धनत्रयोदशीला लोक ॲल्युमिनियमचे भांडी किंवा वस्तू खरेदी करतात. राहूचा संबंध ॲल्युमिनियमशी खूप असतो. आणि त्यामुळे अशुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला ॲल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो ?

 

Exit mobile version