Diwali 2022 : यंदा दिवाळी मध्ये धमाकेदार ऑफर, घ्या स्वस्तात कार

Diwali 2022 : यंदा दिवाळी मध्ये धमाकेदार ऑफर, घ्या स्वस्तात कार

दिवाळी हा सण (२१ ऑक्टोबर) पासून सुरु होत आहे. तसेच दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर वेगवेगळया ऑफर येतात. ऑफर म्हटल्यावर आपण भरपूर प्रमाणात खरेदी करतो. कोरोनाच्या काळानंतर यंदा दिवाळी ऑफरची रोषणाई पाहायला मिळणार आहे. तसेच या ऑफर मध्ये आपल्याला चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. दिवाळीत धनत्रयोदशी (Dhantrayodashi) मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होते. हे सर्व लक्षात घेऊन वाहन उत्पादक कंपन्या वाहनांवर मोठया प्रमाणात ऑफर लावतात. चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या दिवाळीत कोणत्या वाहनांवर ऑफर आहे.

हे ही वाचा : Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

 

मारुती वॅगन आर (Maruti Wagon R) : मारुती वॅगन शो रूम मधील किंमत ५.४७ लाख ते ७.२० लाख ही किंमत आहे. तसेच या कारवर आता २५,००० हजार ( twenty five thousand) रुपयांपर्यंत सूट आहे. तर तुम्ही दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करताय तर मारुती वॅगन आर ही कार नक्की खरेदी करा.

मारुती सेलेरियो (Maruti Celerio) : मारुती सेलेरियो (Maruti Celerio) या कारची किंमत शो रूम मध्ये ५.२५ लाख ते ७.०० लाख रुपये आहे. आणि या कारवर ३५,००० (thirty five thousand) रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. जर दिवाळीत कार खरेदी करताय तर मारुती सेलेरियो ही कार खरेदी करा.

 

टाटा टियागो (Tata Tiago) : टाटा टियागो (Tata Tiago) या कारची किंमत शो रूम मध्ये ५.४० लाख ते ७.८२ लाख आहे. आणि या कारवर १०,००० रुपयांची सवलत आहे.

मारुती इग्निस (Maruti Ignis) : मारुती इग्निस (Maruti Ignis) या कारची किंमत शो रोम मध्ये ५.१७ लाख आहे. तर दिवाळीत ह्या कारवर ३०,००० हजार (thirty thousand) रुपयांची सूट मिळत आहे.

मारुती सियाझ (Maruti Ciaz) : मारुती सियाझ (Maruti Ciaz) या कारची किंमत शो रूम मध्ये ८.९९ लाख ते ११.९८ लाख आहे. तर दिवाळी खास ऑफर म्हणून या कारवर ३०,००० हजार ((thirty thousand) रुपयांची सूट आहे.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत आहात ? तर ‘या ठिकाणी नक्की भेट द्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version