Diwali 2022 : दिवाळीत स्पेशल घ्या… मुलांसाठी ट्रेंडी कपडे

Diwali 2022 : दिवाळीत स्पेशल घ्या…  मुलांसाठी ट्रेंडी कपडे

दिवाळी म्हटले की उत्साहाचा सण. तसेच दिवाळीत मुलांना आणि मुलींना नवीन कपडे घालायला खूप आवडते. दिवाळीत अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच खरेदी करायला आवडते. वर्षभर आपण कितीही खरेदी केली तरी दिवाळीची खरेदी ही खूप खास असते. दिवाळीच्या निमित्याने आपण एकमेकांच्या घरी जातो मित्र आणि मैत्रिणीला भेटतो दिवाळीच्या शुभेच्या देतो. तसेच दिवाळी पहाट , लक्ष्मीपूजन , भाऊबीज , दिवाळी पाडवा या निमित्याने आपण नवीन नवीन आऊटफिटची खरेदी करतो. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळीसाठी खास काही ट्रेंडी ड्रेस दाखवणार आहोत.

हे ही वाचा: Diwali 2022 : दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत आहात ? तर ‘या ठिकाणी नक्की भेट द्या

 

कोणता पण कार्यक्रम असो लेहंगा चोळी खूप मस्त दिसते. मग साखरपुडा असो किंवा दिवाळीचा सण. ट्रेडिशनल दिसण्यासाठी लेहंगा चोळी हा चांगला उत्तम पर्याय आहे. तसेच काहीजणांना भरलेले आणि चकमकी कपडे घालायला खूप आवडतात. तर तुम्ही दिवाळीला लेहंगा चोळी खरेदी करू शकता.

दिवाळीसाठी तुम्ही अनारकली कुर्ता देखील खरेदी करू शकता. तुम्ही दिवाळीत नेव्ही ब्लू रंगाचा अनारकली कुर्ता घेऊ शकता. कारण नेव्ही ब्लू रंगामुळे अनारकली ड्रेसला एक वेगळाच लूक येतो. आणि तो खूप उठून देखील दिसतो.

 

 

दिवाळीत तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने साडी देखील घालू शकता. आजकाल ट्रेंडी नवीन नवीन आऊटफिटच्या साड्या पाहायला मिळतात. तुम्ही यंदाच्या दिवाळीत ते देखील खरेदी करू शकता.

 

आजकालच्या मुलांना ट्रेडिशनल लूक करायला खूप आवडतो. ट्रेडिशनल लुकचा आजकाल ट्रेंडच चालू आहे. काही लोकांना असे वाटे की ट्रेडिशनल लुक म्हणजे जुन्या शैलीतील ड्रेस नाही ना. पण असे कपडे देखील स्टायलिश झाले आहेत. हेच कपडे बॉलिवूड कलाकार देखील घालतात. सणासुदी निमित्त पारंपरिक पोशाख घातल्यास एक वेगळाच लूक येतो.

तुम्ही दिवाळी मध्ये ट्रेंडी कुर्ता पायजमा देखील घालू शकता. आजकाल कुर्ता पायजमा याचा ट्रेंड चालू आहे. यामुळे तुम्हाला ट्रेंडी लूक येऊ शकतो. आणि तुम्ही बाकी कार्यक्रमात देखील घालू शकता.

हे ही वाचा: 

Diwali 2022 : दिवाळी सणात ‘या’ गोष्टी घरात आवर्जून करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version