spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : द्या भाऊबीजच्या अनोख्या शुभेच्छा…

या वर्षी दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. तसेच भाऊबीज हा सण दिवाळीमध्ये खूप महत्वाचा असतो. भाऊबीज म्हणजे भाऊ- बहीणच गोड नात. या वेळी भाऊबीज आणि दीपावली पाडवा हे सण एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. भाऊबीजच्या निमित्याने भाऊ – बहीण एकमेकांना भेट वस्तू आणि शुभेच्छा देतात. तर आज आम्ही तुम्हाला भाऊबीजच्या शुभेच्छा सांगणार आहोत.

हे ही वाचा : मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

 

भाऊबीजचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. भाऊ – बहिणचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस मानला जातो.

दीपावलीचा आरंभ होतो,
पणत्यांच्या साक्षीने,
नात्यांचा आरंभ होतो, दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।।

दिवाळीच्या प्रकाशात पहाट आली,
आनंदाचे क्षण घेऊन,
बहीण भावाच्या गोड नात्याला शुभेच्छची साथ देऊ,
भाऊबीजच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, भाऊबीज घेऊन आला सण,
या सणांनी होते बहिण भावाच्या नात्याची सुरुवात,
असा हा गोड सण,
भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

कधी नको काही तुझ्याकडून भावा,
फक्त तुझी साथ हवीय,
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे,
भाउबीच्या प्रेमळ शुभेच्छा।।

आपल्या बहिणीवर जेवढे प्रेम करता.,
तेवढेच प्रेम इतरांच्या बहिणीवर देखील करा,
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा।।

फुलांचे आणि तारांचे असे म्हणे आहे की,
एक हजारांमध्ये माझी सोन्यासारखी बहिण आहे,
भाऊबीजच्या खूप खूप आनंदायी शुभेच्छा।।

सण प्रेमाचा,
सण आनंदाचा,
सण उत्साहाचा,
सण बहिण भावाच्या पवित्र नात्यांचा,
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा।।

आई सारखी काळजी करते,
बाबा सारखी मेहेनत करते,
अशी माजी गोड बहिण,
माझ्या गोड बहिणीला,
भाउबीच्या खूप खूप शुभेच्छा।।

माझ्याशी रोज भांडतोस,
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी,
मला हवं ते गिफ्ट आणतोस,
भाऊबीजच्या मनापासून खूप शुभेच्छा।।

दिव्यांना साथ असते प्रकाशाची,
बहिणीला आस असते भावाच्या प्रेमाची,
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा।।

हे ही वाचा :

Diwali 2022 : द्या लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा…

 

Latest Posts

Don't Miss