Diwali 2022 : लक्ष्मीपूजन कसे केले जाते…

Diwali 2022 : लक्ष्मीपूजन कसे केले जाते…

दिवाळी हा सण रोषणाईचा असतो. दिवाळीत अश्या काही वस्तू असतात ज्या वापरू नये. दिवाळी हा असा सण आहे की, या सणामध्ये पाच सण साजरे करायला मिळतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात सोने, चांदीचे दागिने, धातू पैशांची देखील पूजा केली जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : द्या लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा…

 

लक्ष्मीपूजन यावेळी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजन केल्यास घरात लक्ष्मीचा वावर राहतो. आणि सुख समृद्धी नांदते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी दागिन्यांची, झाडूची , पुस्तके , धातू यांची देखील पूजा केली जाते. सायंकाळी ६ वाजून ते ८. ३८ पर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन चा दिवशी एकमेकांना फराळासाठी आमंत्रण केले जाते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी लोक आपल्या पुस्तकाचे पूजन करून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करतात. म्हणून लक्ष्मीपूजन दिवशी पुस्तकांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन घरोघरी देखील केले जाते. लक्ष्मीपूजन करताना सर्व प्रथम चौरंग घेतात. त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती प्रस्थपित केली जाते. आणि चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढली जाते. लक्ष्मीपूजन दिवशी दागिन्यांची , पैशांची , पुस्तके , धातू यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून अंघोळ केली जाते. आणि कथा सांगून पूजा केली जाते. आणि अंगणात रांगोळी काढली जाते,आणि दिव्यांची रोषणाई केली जाते.

तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची देखील पूजा केली जाते. कारण झाडूला देखील लक्ष्मी मानले जाते. झाडू वर थोडे पाणी शिंपडून त्याला हळद , कुंकू वाहतात. त्यानंतर फुल ठेवून त्याची पूजा केली जाते. पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडून घर स्वच्छ करून घरातली घाण बाहेर काढतात.

तसेच लक्ष्मीपूजनला झाडूला खूप महत्त्व दिले जाते. तसेच झाडूला पाय न लावणे, कधी आपले लक्ष नसतांना झाडूला पाय लागला तर लगेच नमस्कार करून घ्यावा. झाडू ने कधी ही कोणाला मारू नये तसेच प्राण्यांना देखील मारू नये.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा! फसवणुकीपासून सुरक्षित रहा

 

Exit mobile version