spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत किल्ले कसे बांधायचे? घ्या जाणुन

दिवाळी या सणाला आज पासून सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर लहानमुलांच्या दिवाळीच्या सुट्या येतात. दिवाळीच्या सुट्या म्हणजे आनंद आणि उत्साह. आपण जेव्हा लहान होतो, त्यावेळी शाळेला दिवाळीची सुट्टी कधी मिळते ? आणि कधी आपण किल्ला बनवतो असा उत्साह असायचा. दिवाळीची सुट्टी पडली की आपण किल्ला बनवण्यासाठी साहित्य जमा करण्याची सुरुवात करायचो. किल्ले म्हणजे आपले भारतीय संस्कृती जपणारा इतिहास चला तर मग जाणून घेऊया किल्ला कसा बांधायचा.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत किल्ला का बांधतात ? जाणून घ्या…

 

किल्ला कसा बनवायचा ? –

गावाकडची मुले दगड, शेण, माती, चिकट धान्याचे पीठ, अशी साहित्य एकत्र करून किल्ला बनवत असे. किल्ला बनवण्यासाठी प्रत्येक मुलांना काम वाटून दिली जातात. जसे की किल्ला बनवण्यासाठी काही मुलांना माती आणे , तर काही जणांना झेंडा आणे , दगड आणे, घोडे , मावळे , शिवाजीची मूर्ती अशा प्रकारची कामे वाटू दिली जातात. किल्ला बनवून झाला की त्यावर वेगवेगळया प्रकारचे नक्षीकाम करतात. आणि फुलांचे तोरण देखील बांधतात. आणि सांध्यकाळी किल्ल्यांवर दिवे लावले जातात. तसेच शहरामध्ये किल्ले बनवणे खूप अवघड जाते. शहरामध्ये जागेची कमतरता असते. आणि दगड, शेण, माती, चिकट धान्याचे पीठ, हे साहित्य देखील मिळणे अवघड होऊन जाते. शहरात पियोपीचे किल्ले बनवले जातात. आणि त्याचे प्रदर्शनमोठ्या प्रमाणात केले जाते. पण खरी मज्जा तर गावी असते. जरी शहरात किल्ले मुलांना गावाकडील सारखे किल्ले बनवता येत नसतील तरी त्यांना त्यामागील इतिहास देखील माहित असतो.

किल्ला आणि बालपण –

बालपणी किल्ला बनवायची एक वेगळीच मज्जा असायची. किल्ला हा शब्द बोलायला खूप सोपा असतो. पण तो बनवायला खूप कठीण असतो. बालपणी किल्ला बनवताना आपण आपले मित्र मैत्रिणी गोळा करतो आणि किल्ला बनवण्यासाठी सुरूवात करतो. बालपणीचे दिवस म्हणजे आठवणीतले रमणीय दिवस असतो. आता आपण ते दिवस आठवले तर आपल्याला हसू येते.

हे ही वाचा :

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीला घर सजवा ‘या’ खास दिव्यांनी

 

Latest Posts

Don't Miss