Diwali 2022 : जाणुन घ्या लक्ष्मी पूजनचे महत्त्व, आणि पूजा विधी

Diwali 2022 : जाणुन घ्या लक्ष्मी पूजनचे महत्त्व, आणि पूजा विधी

नवरात्री सणानंतर सर्वांना दिवाळी सणाची चाहूल लागते. तसेच दिवाळी हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. या वेळी दिवाळी हा सण २१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दिवाळी म्हटले की १५ दिवस अगोदरच लोक फराळ करायला घेतात. दिवाळी म्हणजे अंगणात रांगोळी काढणे. आणि दिवे लावून रोषणाई करणे. दिवाळी सणात लक्ष्मीपूजनला खूप महत्व आहे. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजन केल्यास घरात आनंदी आणि निरोगी वातावरण राहते. तर आज तुम्हाला या बातमी मधून लक्ष्मीपूजन चे महत्त्व सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

 

लक्ष्मीपूजनचे महत्त्व –

अश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्यकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. प्राचीन काळात रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जात होता. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा सांस्कृतिक कार्यक्रम केला जात होता. गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली होती. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्याने “आर्थिक व्यवहारातील सचोटी आणि नीती” आणि “अर्थ प्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता” अशी दोन महत्वाची मूल्ये मानली जातात. ही लक्ष्मीपूजनची विशेषता आहे.

 

लक्ष्मीपूजनची पूजा विधी –

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी लोक आपल्या पुस्तकाचे पूजन करून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करतात. म्हणून लक्ष्मीपूजन दिवशी पुस्तकांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन घरोघरी देखील केले जाते. लक्ष्मीपूजन करतांना सर्व प्रथम चौरंग घेतात. आणि त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती प्रस्थपित केली जाते. आणि चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढली जाते. लक्ष्मीपूजन दिवशी दागिन्यांची , पैशांची , पुस्तके , धातू यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून अंघोळ केली जाते. आणि कथा सांगून पूजा केली जाते. आणि अंगणात रांगोळी काढली जाते,आणि दिव्यांची रोषणाई केली जाते.

हे ही वाचा :

Diwali 2022 : धनत्रयोदशी म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा विधी

 

Exit mobile version