Diwali 2022 : दिवाळीत दिवे लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…

Diwali 2022 : दिवाळीत दिवे लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…

कोरोनाच्यानंतर दिवाळी हा सण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसणार आहेत. दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. दिवाळी म्हटले की कंदील, दिवाळीचे फराळ, दिवे , खरेदी आलीच. या वेळी दिवाळी २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. दिवाळीमध्ये काही लोक १५ दिवस अगोदरपासून दिवाळीचे फराळ आणि दिवाळीची खरेदी करायला घेतात. तसेच दिवाळी या सणामध्ये आपल्याला वेगवेगळे सण साजरे करायला मिळतात. जसे की लक्ष्मीपूजन, भाऊबीज दिवाळी पाडवा, वसुबारस, दिवाळी पहाट असे सण साजरे करायला मिळतात. असे सण म्हटले की घरात पणत्या लावून रोषणाई केली पाहिजे. दिवाळीच्या दिवसात घरात पणत्या लावल्यास सुख – समृद्धी राहते. त्याचसोबत रोषणाई देखील राहते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून दिवे कोणत्या प्रकारे लावायचे ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत मिठाई विकत घेणार आहात का ? तर ‘या’ गोष्टीची काळजी नक्की घ्या

 

अश्विन महिन्यात सुरु होणार दिवाळी या सणामध्ये पणत्यांना देखील खूप महत्व आहे. पणत्या कोणत्या दिशेला लावल्या पाहिजे कोणत्या दिशेला नाही लावल्या पाहिजे या मागे देखील शास्त्र आहे. तसेच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, भाऊबीज , वसुबारस या सणांना देखील महत्व आहे. दिवाळी वसुबारसपासून सुरुवात होते. या दिवसापासूनच घरात, अंगणांत देखील पणत्या लावल्या जातात, आणि घरात रोषणाई केली जाते. दिवाळीत लक्ष्मीपूजनची आणि श्री गणेशाची पूजा केली आणि त्याच सोबतच धातू, दागिने, पुस्तके, पैसे यांची पण पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरात काळोख नसावा. अन्यथा लक्ष्मी मातेची कृपा होणार नाही असे म्हटले जाते. म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी अंगणात आणि घरातदेखील पणत्या लावल्या जातात आणि त्या पूर्वेच्या दिशेने लावल्या जातात.

वास्तूशास्त्रानुसार घरात रंगीबिरंगी पणत्या लावल्या जातात.

घरात दिवाळीच्या दिवशी रंगीबेरंगी लाइटिंग लावल्या जातात. रंगांची काळजी घेतली जाते, आणि ते शुभ ठरते.

जर तुम्ही मातीच्या पणत्या लावत असेल तर त्या चिर पडलेल्या नसाव्या याची काळजी घेणे. खरेदी करताना नीट बघून खरेदी करणे.

दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे दक्षिणेकडे तोंड करून लावावे. कारण दक्षिण ही दिशा यमाची असते. म्हणून याला यमदीप असे देखील म्हणतात. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावणे शुभ मानले जाते.
दिवाळीत तुपाचे दिवे लावणे शुभ मानले जाते.

दिवे लावण्याची सुरुवात कधीपण देवघरपासून करावी.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे घरच्या दोन्ही बाजूस लावणे ते शुभ मानले जाते.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत शॉपिंग करत आहात ? तर तुमच्यासाठी खास टिप्स

 

Exit mobile version