Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट नानकटाई…

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट नानकटाई…

दिवाळी हा सण आनंदाने आणि उत्साहाने लोक साजरा करतात. दिवाळी म्हटले की फराळ आणि फटाके, कंदील रांगोळी आलेच. दिवाळी सण म्हटले की काही लोक १५ दिवसच अगोदर फराळ करायला घेतात. तसेच दिवाळीत आईला फराळ बनवण्याचा आनंद आणि उत्साह असतो. आपण दिवाळीत लाडू , चकली , चुडा , करंजी आपण हे पदार्थ बनवत असतो. तसेच आज आम्ही तुम्हाला नानकटाई घरच्या घरी कशी बनवायची ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया नानकटाई कशी बनवायची.

हे ही वाचा: Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

 

नानकटाई हा पदार्थ सर्वांना खायाला आवडतो. नानकटाई अगदी मऊ आणि खायाला खूप खुसखुशीत असते. नानकटाई सर्व जण वेगवेगळया पद्धतीने बनवतात. जसे की चॉकलेट , वॅनिला , वापरून नानकटाई बनवली जाते. नानकटाई हा पदार्थ बोलायला खूप सोपा असतो पण तो बनवतांना खूप मेहनत लागते. नानकटाई म्हणजे एक प्रकारचे बिस्कीट. हा पदार्थ रव्यापासून बनवला किंवा बेसनच पीठ वापरून पदार्थ बनवला जातो.

साहित्य –

एक कप मैदा, अर्धा कप बेसन पीठ, एक चमचा रवा, अर्धा कप पिठीसाखर, अर्धा कप तूप, चवीला मीठ, वेलची पावडर, सजावटीसाठी पिस्ते, काजू , बदाम आवडीनुसार.

 

कृती –

सर्व प्रथम मैदा आणि बेसनाचे पीठ एका भांड्यात चाळून घेणे. नंतर दुसऱ्या भांड्यात तूप घ्या आणि ते चांगले फेटून घ्या. तूप चांगले फेटून झाल्यानंतर त्यामध्ये मैदा, बेसन पीठ, रवा, पिठी साखर, मीठ आणि वेलची पावडर घालून घ्या. नंतर ते मिश्रण चांगले मळून घ्या. मिश्रण चांगले मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. त्यानंतर नानकटाई बेक करण्यासाठी ठेवा. पण बेक करण्यासाठी ठेवण्याचा अगोदर थोडे नानकटाई मध्ये अंतर ठेवा. कारण आपण जेव्हा नानकटाई बेक करण्यासाठी ठेवतो त्यावेळी त्या फुगतात मग एक मेकांना चिकटतात. आणि त्या फुटू देखील शकतात. म्हणून त्यात थोडे अंतर ठेवणे. बेक झाल्यानंतर सजावटी साठी नानकटाई मध्ये थोडा दाब द्या आणि पिस्ता, काजू , बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घ्या.

हे ही वाचा:

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

 

Exit mobile version