spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत बनवा चविष्ट साजूक तुपातले बुंदीचे लाडू…

दिवाळी सण म्हटल्यावर फराळ तर आले. दिवाळी मध्ये फराळ खाण्यासाठी एकमेकांना आमंत्रण करतो. दिवाळी हा असा सण आहे की जिथे नाती जोडली जातात. दिवाळी मध्ये आपल्याला ५ सण साजरे करायला मिळतात. तसेच दिवाळी मध्ये सर्वांच्या घरी फराळ बनवण्याची तयारी चालू झाली आहे. दिवाळीत तेच तेच फराळ बनवून कंटाळा असाल. दिवाळीत कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न नक्की तुम्हाला पडत असेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी दिवाळी खास बुंदीचे लाडू कसे बनवाचे ही रेसिपी घेऊन आलो आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा 

 

लाडू म्हटले की जिभेला पाणी सुटे. काही जण वेगवेगळया प्रकारचे लाडू बनवत असतात. लाडू असा पदार्थ आहे की तो खाण्यासाठी सर्वांनाच आवडतो. आणि लोक सुद्धा आवडीने खातात. लाडू मध्ये बुंदीचे लाडू , बेसनचे लाडू , रव्याचे लाडू , अशा खूप साऱ्या पद्धतीचे लाडू आपल्याला पाहायला आणि खाण्यासाठी मिळतात. लाडू हा पदार्थ दिसतो छान पण तो बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

बुंदीचे लाडू बनवण्याची रेसिपी –

साहित्य –

बेसन – १/४ कप

तूप

मीठ चिमूटभर

पिठी साखर

वेलची पूड

काजू

बदाम

बेदाणे

बुंदी

 

कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात बेसन घ्या त्यामध्ये तूप घाला. चिमूटभर मीठ घाला. आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट होऊन द्या मात्र त्याचे गोळे हुन देऊ नका. त्यानंतर तेल गरम होऊन द्या. तेल गरम झाल्यानंतर तेलाच्या कढईवर झारा ठेवा आणि पीठ त्या मधून कढईत घालून घ्या. पीठ आपोआप झाऱ्यातून तेलात पडले पाहिजे. जर पडत नसेल तर १-२ थेंब पाणी घालून थोडे पातळ करून घ्या मग झाऱ्यावर घाला. झारा थोडासा वर खाली हालवून बुंदी तेलात पाडून घ्या. पीठ तेलात पडायचे थांबल्यावर झारा बाजूला करून झाऱ्यावर राहिलेले पीठ परत उरलेल्या पिठात घाला व झारा पाण्याने धुऊन व फडक्याने कोरडा करून घ्या. त्यानंतर बुंदी सतत हलवत राहा. त्यानंतर एका कढईत पाणी घालून घ्या आणि त्यात साखर मिक्सकरून करून घ्या आणि त्याचा पाक तयार करून घ्या. पाक चांगला तयार झाल्यानंतर त्यामध्ये बुंदी पाकात मिक्सकरून घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या. लाडू वळून झाल्यानंतर त्यावर तुम्ही काजू बदाम लावून सजावट करू शकता.

हे ही वाचा :

Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss